संपादक
विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील
कार्यालय या ठिकाणी लोकशाही दिन साजरा होत असतो. यामध्ये जनतेने दिलेल्या अर्जातील
लेखी म्हणणे, अडचणी त्या लोकशाही दिनात दिलेल्या अर्जानुसार त्वरित दखल घेवून
जनतेला न्याय दिला पाहिजे. परंतु लोकशाही दिनात जनतेने दिलेले अर्ज त्यानुसार फक्त
अधिकारी पत्र व्यवहार करून ज्या त्या कार्यालयाकडे पाठवीत असतात. ठोस निर्णय घेत नाहीत.
लोकशाही दिन हा न्याय दिन जनतेसाठी ठरला पाहिजे. परंतु सध्या लोकशाही दिन अधिकार्याची
अशीही बनवाबनवी असा झाला आहे. लोकशाही दिनातील अधिकारी यांच्याकडे जनतेने दिलेल्या
अर्जानुसार त्वरित निवारण करून अर्जदाराला न्याय दिला पाहिजे. अर्जदार वेळ, पैसा घालवून
लोकशाही दिनात न्याय मिळेले ही अपेक्षा बाळगून अर्ज देत आहेत. परंतु अर्जदाराच्या हाती
निराशाच येत आहेत. लोकशाही दिन हवा कशासाठी? त्याचा उपयोग काय? हे अधिकारी यांनी लक्षात घेतले पाहिजे. लोकशाही दिन हा
जनतेचे प्रश्न अडीअडचणी, आलेल्या अर्जाचे निवारण करून त्वरित न्याय द्यावे. हे लोकशाही
दिनाचे वैशिष्ट आहे. परंतु लोकशाही दिन हरामखोर अधिकारी यांच्यामुळे या न्याय दीनाला
गालबोट लागले जात आहे. केवळ शासनाच्या परिपत्रकाचे आम्ही पालन करीत आहोत हे दाखविण्यासाठी
अधिकारी लोकशाही दिन साजरा करीत आहेत. लोकशाही दिनातील जनतेचा अर्ज म्हणजे निवारण करून
न्याय देणे असा असायला हवा. परंतु अधिकारी यांच्या नासक्या मानसिकतेमुळे या लोकशाही
दिनातील अर्जदाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. न्याय मिळत नाही. लोकशाही
दिन सध्या जनतेसाठी शापदिन ठरत आहे. त्याचप्रमाणे लोकशाही दिनात जास्त करून ग्रामपंचायत
गावठाणात राहणार्या कुटुंबाचे अर्ज जागा नावावर करण्यासाठी आदेश ग्रामपंचायतला देण्यात
यावेत. यासाठी लोकशाही दिनात अर्ज दाखल करतात. ग्रामपंचायत वर गटविकास अधिकारी हे नियंत्रण
अधिकारी असतात. परंतु काही तालुक्याचे गटविकास अधिकारी जातिवादी, टाळाटाळ
करणारे, दखल न घेणारे असे हरामखोर अधिकारी मी संपादक म्हणून पाहिले
आहे. अधिकारी यांनी दफ्तर दिरंगाई कायद्याचा मान ठेवून लोकशाही दिनात आलेल्या अर्जानुसार
न्याय देवून कर्तव्य पार पाडले पाहिजे. लोकशाही दिन हा न्यायदिन ठरावा. लोकशाही दिनात
अर्जदाराच्या अर्जाला न्याय मिळत नसेल तर लोकशाही दिन काय कामाचा? लोकशाही
दिनातील अर्जाचे निवारण करून अधिकारी यांनी न्याय द्यावा. तसेच अडचण असल्यास अर्जदाराला
मार्गदर्शन करावे. हीच अपेक्षा.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय
उद्दीष्ट आहे.