संपादक
सध्या रोडवर येणे जाणे जनतेसाठी दुख:द घटना झाली आहे. सध्या टू व्हीलर, फोर व्हीलर, इतर वाहनांवर पोलिस बांधव कारवाई करीत असल्याचे दिसत आहेत. “सीट बेल्ट वाहनामध्ये असणे गरजेचे झाले आहे.” मंत्र्यांनी आदेश सोडायचा आणि पोलिस बांधवांनी जनतेवर अन्याय करायचा हे सध्या जोमात चालू आहे. जनतेने कसे जगायचे? फिरावे की नाही? असे प्रश्न जनतेला पडले आहेत. सध्या पोलिस बांधव जनतेच्या मुळावर उठले आहेत. लायसन्स, हेलमेट, इन्सुरन्स, सीट बेल्ट, नंबर प्लेट, गाडी जुनी किंवा नवी, हॉर्न, टायर नवीन जुने, इ. विचारून पोलिस बांधव जनतेला कोंडीत पकडीत आहेत. ज्या जनतेने हरामखोरांना आमदार खासदार केले, ते मंत्री झाले. तेच जनतेच्या जिवावर उठले आहेत. सध्या देशात हुकुमशाही चालू आहे. जो तो केंद्रातील असो वा कोणत्याही राज्यातील मंत्री मनात येईल ते आदेश काढून जनतेला वेठीस धरत आहेत. जनतेला चांगले दिवस येतील, देश व देशातील जनतेचे कल्याण होईल यामुळे राजकर्त्यांनी दिलेल्या आश्वासनाला बळी पडून जनतेने मतदान केले आणि सत्तेवर बसविले. त्याच राजकर्त्यांनी जनतेचा छळ चालू केला आहे. यामध्ये शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी इ.चे या राज्यकर्त्यांनी वाटोळे केले आहे. सध्या आमदार, खासदार विकत घेणे ही केंद्रातील व प्रत्येक राज्यातील आमदार, खासदारासाठी शासनाची योजना चालू आहे. याचा फायदा फक्त आमदार, खासदार यांनाच आहे. आमदार, खासदार कोट्यधीश तर जनता रोडपती झाली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी सीट बेल्ट वापरण्यास सक्ती केली आहे. त्यामुळे कधीही रस्त्यावर न दिसणारे पोलिस बांधव सध्या जनतेची वाट लावण्यासाठी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी, अन्याय करण्यासाठी सध्या पोलिस बांधव जोमात आहेत. रस्त्यावर पोलिस बांधव गाड्यांची आडवाअडवी करीत आहेत त्यामुळे पोलिस बांधव “देवदूत की यमदूत” जनतेसाठी आहेत की काय हेच समजत नाही. सध्या तर पोलिस बांधवांना जगण्याचे कुराण झाले आहे. सीट बेल्टच्या नावाखाली पोलिस बांधवांचा पगार सोडून दर दिवसाला खिसा पैशाने भरला जात आहे. मंत्र्यांचे आदेश “पोलिस जोमात, जनता कोमात” ही परिस्थिति देशभर व महाराष्ट्रात छोट्या मोठ्या रस्त्यावर दिसत आहे. मी घेतलेल्या अनुभवावरून जे दिसले तेच लिहले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी.
आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक
बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे
पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.