संपादक :बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते तालुका माळशिरस, जि.सोलापूर येथे पोलिस स्टेशनमध्ये नूतन बदली होऊन आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी
श्री.प्रवीण संपांगे यांनी नातेपुते पोलिस स्टेशनमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या
बैठकीत चोरी, वाद-विवाद इत्यादि विषयावर चर्चा संपन्न झाली. पोलिस
अधिकारी श्री.संपांगे म्हणाले की, आम्ही जनतेचे सेवक आहोत व जनतेचे
रक्षण करणे ती आमची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यास आम्ही कमी पडणार नाही. तसेच जनतेनेही
सतत दक्ष जागृत रहावे. व्यवसाय करीत असताना जर त्या व्यवसाय धारकाने कमविलेला पैसा, सोने इत्यादी वस्तु चोरट्याने चोरून नेल्यास तो व्यवसाय धारक अधोगतीकडे जातो
व कमविलेले क्षणात होतेचे नव्हते होत. तसेच नातेपुते पोलिस स्टेशनला कर्मचारी यांची
संख्या कमी आहे. त्यामुळे पोलिस खात्यावर प्रचंड ताण पडत आहे. असे असताना सर्वांनी
आपआपल्यापरीने जागृत रहावे असे आवाहन नातेपुते पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी
श्री.प्रवीण संपांगे यांनी केले. यावेळी विविध दैनिक, साप्ताहिक, चॅनेलचे संपादक पत्रकार तसेच व्यापारी व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पोलिस
स्टेशनचे कर्मचारी इ. उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.