संपादक
केंद्र सरकारने भारत देशातील
जनतेसाठी एक देश एक सिधापत्रिका हा निर्णय जनतेच्या हिताच्या दृष्ठीने अत्यंत
महत्वपूर्ण व योग्य आहे या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे देशाचे नागरिक
रहिवासी व सुपुत्र म्हणून वावरतील व
त्यांना देशातील राज्यात,
जिल्ह्यात, तालुक्यात, गावात कोठेही रेशन दुकानातून
त्या कुटुंबांना, त्या नागरिकांना
जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य मिळेल.
त्यामुळे कोणीही वंचित व परका म्हणून त्या कुटुंबांना संभोधनार नाही त्यांचा तो
हक्क व अधिकार राहणार आहे त्यासाठी त्वरित अंमलबजावणी केंद्र सरकारने अंमलबजावणीकरावी
व तसे आदेश जलद गतीने सर्व राज्यातील जिल्हाधिकारी यांना द्यावेत. या निर्णयामुळे
खर्या अर्थाने संविधानाने त्या कुटुंबाला न्याय दिला असे होईल. सध्याच्या काळात
आम्ही गावचे रहिवासी हे परक्या गावचे हा जो भेदभाव मोठ्या प्रमाणात जास्त करून
ग्रामीण भागात दिसतो त्यामुळे त्या कुटुंबाला अपमान सहन करावा लागतो. मान खाली
घालावी लागते तसेच विविध शासनाच्या योजना त्या कुटुंबाला मिळू नयेत यासाठी ग्रामीण
भागातील काही निवडक मंडळी दुजाभाव करतात. त्यामुळे केंद्र सरकारने एक देश एक
सिधापत्रिका या निर्णयामुळे आपल्या देशाचे खरे नागरिक आहोत आपण सर्व एकसंघ, एकनिष्ठ या देशाचे नागरिक आहोत, आमच्यामध्ये कोणताही दुरावा
नाही. जातिभेद, धर्मभेद नाही हा
निर्णय सांगतो. हा निर्णय देशासाठी व देशातील जनतेसाठी मौल्यवान आहे. या
निर्णयामुळे कोणीही कोणाचा द्वेष,
मत्सर, अपमान, मानहानी करू शकणार नाही व जो
करेल त्याला संविधानाने शिक्षा होईल. हा निर्णय देश व जनता यांचे हित जोपासणारा
आहे त्यामुळे अंमलबजावणी त्वरित होणे गरजेची आहे. हा निर्णय देश व जनतेसाठी
स्वाभिमानाचा आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय खर्या अर्थाने या देशातील
जनतेला एक आधार असणार आहे. देशात,
राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, कोणत्याही गावातील दुकानात त्या
लाभार्थी यांना लाभ होईल. त्यामुळे त्यांचा दैनंदिन जीवनातील पोटापाण्याचा प्रश्न
सुटेल ते कुटुंब आनंदी राहील. हा निर्णय केंद्रीय मंत्री रामविलास पासवान साहेब व
त्यांच्या सरकारने घेतला त्या सर्वांचे अभिनंदन...! अशा प्रकारचे निर्णयाचे जनता
सदैव कौतुक करेल सरकारविषयी कोणीही तिरस्कार करणार नाही. या निर्णयामुळे
समाजासमाजामध्ये,वादविवाद, आम्ही रहिवासी, ते बाहेर गावचे असा भेदभाव राहणार नाही. हा निर्णय देशासाठी व
देशातील जनतेसाठी न्यायकारक,
हितकारक, प्रेरणादायक, स्पृतीदायक, गौरवशाली निर्णय आहे. नुसता
निर्णय नको तर अंमलबजावणी त्वरित करावी. हा निर्णय मी, आम्ही, आपण सर्वजण भारतीय असल्याचा एक
भक्कम पुरावा ठरू शकतो. या निर्णयाचे स्वागत व केंद्र सरकारला शुभेच्छा व सर्वांचे
अभिनंदन...!
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार