संपादक
महाराष्ट्र
राज्यातील ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे. सध्याच्या या कोरोना
कोव्हिड-१९ या रोगाच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका घेणे योग्य नाही असे शासनाचे
मत आहे त्यामुळे त्याच गावातील स्वच्छ, पारदर्शी, उच्चशिक्षण, एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता
असे असलेला त्याच गावातील ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्या सामाजिक
कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी
अधिकारी यांनाच तो अधिकार असावा. त्यामध्ये राजकीय पुढार्यांचा हस्तक्षेप नको.
प्रशासक नेमताना तो अडाणी,
कमी शिकलेला, अवैध धंदे करणारा व
गुन्हेगारी वृत्तीचा नसावा. त्यागावातील जनतेच्या अडीअडचणी सोडविणारा गावाचा विकास
करणारा व त्या विकासाची माहिती असणारा असावा. ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा
कार्यकाळ संपला आहे त्यातील कोणत्याही सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना अधिकार
देऊ नयेत व प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये असे वाटते. सामाजिक कार्यकर्त्याला
प्रशासक म्हणून नेमण्यात यावे तसेच पोलिस पाटला सारखी परीक्षा प्रशासक पदासाठी
घेण्यात यावी. त्यामुळे जे चांगल्या पद्धतीने जो पास होईल त्याची नेमणूक मुख्यकार्यकारी
अधिकारी यांनी करावी म्हणजे
वादावाद होणार नाही व कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप चालणार नाही. सध्या
प्रशासक नेमण्यासाठी पालकमंत्री व मुख्यकार्यकारी अधिकारी यांचाकडे अधिकार शासनाने दिले
आहेत. यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात याचिका दाखल केले आहेत असे
कळते. त्यामुळे कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतला त्वरित बडतर्फ करून सामाजिक
कार्यकर्ते यांना त्या ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून नेमणूक करावी असे वाटते.
ज्या वेळी आपत्तीची काळ अगर आषाढी वारी सारखा सोहळा असतो त्या वेळीला स्वयंसेवक
म्हणून शासनाला सहकार्य करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाते त्याच
पद्धतीने कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतची मुदत संपलेली आहे. अशा ग्रामपंचायत वरती
प्रशासक म्हणून नेमणूक व्हावी. प्रशासक परीक्षेसाठी त्याच गावातील
कार्यकर्त्याकडून अर्ज मागवून घ्यावेत यासाठी शासनाने मुख्यकार्यकारी अधिकारी
यांना आदेश द्यावेत असे वाटते.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार