Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

आत्महत्या करणारे पुरुष हे नामर्द पणाचे लक्षण ठरू शकते

संपादक

          सध्याच्या काळात माणसावर अनेक संकटावर संकटे येत आहे त्यासाठी कुटुंबाला जगवण्यासाठी घरातील कर्ता पुरुष त्या अडचणी सोडवण्यासाठी एखाद्याकडून कर्ज घेणे, त्या कर्जाचा ताणतणाव येणे त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाणे, कामधंदा न करता सतत इतरांकडून आर्थिक देवाण घेवाण करणे. पाणी अभावी शेती मध्ये काहीच करता न येणे, मुलामुलीचे लग्ने, शिक्षणाचा खर्च अशा विविध समस्या घरातील कर्ता पुरुष या नात्याने असतात पण हे कशामुळे तर स्वत: च्या आळशी पणामुळे काम धंदा न करता सतत दुसर्‍याकडून आर्थिक मदत घ्यायची आणि घर परपंचा चालवायचा हेच काम या पुरुषाचे असते. त्यामुळे घेतलेले पैसे देता येत नसल्यामुळे कुटुंबाला वेठीस धरायचे घरात सतत भांडणतंटे यामुळे तो माणूस आत्महत्या करायचा विचार करतो. मिळालेले जीवन अर्ध्यावर सोडून पत्नीचा, आई, वडील, भाऊ, भावजय, मुले, नातेवाईक यांचा विचार न करता जीवन संपवतो व आपण सुटलो. माझ्या मागे या कुटुंबाचे काही होवो न होवो याची मला काळजी नाही असे मनात आणून अनमोल जीवन संपवतो. परंतु जीवन संपवण्यापूर्वी जर विचार केला असता की, कष्ट करून उपाशी तापाशी कुटुंबाला जगवणे परंतु काही काम करायचे नाही, कर्जबाजारी होयचे आणि त्याचे टेंशन घ्यायचे आणि मरण जवळ करायचे ही मानसिकता निर्माण झालेली असते. जीवनात अनंत अडचणी येत असतात त्यासाठी संघर्ष महत्वाचा असतो. टेंशन आहे म्हणून पुरुषांनी व्यसनाच्या आहारी जायाचे मग घरातील पत्नी मुले यांना टेंशन येत नसेल का? त्यांनी काय करावे? ज्या पुरूषांना गंभीर आजार आहे त्याला बरे होण्यासाठी खर्च करता येत नाही. परिस्थिति बिकट असते, वेदना सहन करू शकत नाही व कुटुंबाला आपला त्रास नको म्हणून टोकाची भूमिका घेऊन पुरुष आत्महत्या करतो हे वेगळे आहे ही त्याची मानसिकता किंवा येणारी आर्थिक अडचण. बांधवांनो कामधंदा करा, परिस्थिति पाहून काम करा, व्यसन करू नका, व्यसनाच्या आहारी जाऊन स्वत: चे व कुटुंबाचे नुकसान करू नका, मिळालेले जीवन आनंदाने जगा, जन्म आहे म्हणजे मरण हे आहे परंतु अर्ध्यावरती कंटाळून जीवन संपवू नका त्यामध्ये पुरुषार्थ नाही तर तो नामर्द आहे. आत्महत्या करण्यापूर्वी का विचार केला नाही आपण काम धंदा केला पाहिजे, कोणाकडून आर्थिक पैसे व्याजाने घेऊ नये आपल्याला मानसिक त्रास होऊ नये. यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे नुकसान होईल इ. कारणे आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी केला तर ही वेळ येणारच नाही यासाठी काळजी करावी. बांधवांनो जीवन एकदाच आहे याचा विचार करा परंतु आत्महत्याचे पाऊल उचलू नका हीच अपेक्षा...!     

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 


Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...