संपादक
सध्या सोशल
मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या जन्म तारखा समजत असून त्यामुळे आपल्या मित्राचे, नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी
मित्रच मित्रासाठी एकत्र येऊन वाढदिवस साजरे करीत असतात हा अविस्मरणीय क्षण असतो. या
वाढदिवसामुळे एकसंघपणा, एकीचेबळ
निर्माण होताना दिसते. पूर्वी नेत्यांच्याच वाढदिवसाला युवक वर्ग जायचा सध्या तशी परिस्थिति
राहिली नाही. नेत्याला मागे टाकून आपले मित्रच, आपले नेते, सामाजिक कार्यकर्ते
असे समजून एकमेकांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करताना दिसतात खूप बरे वाटते. या
वाढदिवसामुळे जात,पात, धर्म असा भेदभाव उरत नाही. सर्व
मिळून मित्रच मित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवस साजरा करतात. प्रत्येकाच्या
चेहरावरती आनंद दिसून येतो. सर्व मित्र मंडळी अगदी मित्राच्या वाढदिवसामुळे खुश असताना
दिसतात. सध्या मित्र आपल्या मित्राचे वाढदिवस नेत्यांच्या वाढदिवसापेक्षाही जोरात साजरे
करतात. नेत्यांच्या वाढदिवसाला सध्या युवकांची पसंती दिसत नाही मात्र मित्रांच्या वाढदिवसाला
मित्रांची पसंती मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या वाढदिवसामुळे युवकांचे मोठी फळी निर्माण
होताना दिसते. सामाजिक कार्यात युवक सर्व मिळून मिसळून आपले कर्तव्य समजून काम करतात.
वाढदिवसातून मैत्री घट्ट बनते, माणुसकी
दिसून येते, युवक नेत्यांच्या वाढदिवसाला
शुभेच्छा देतात पण नेते मंडळी युवकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत नाहीत ही खंत वाटते.
त्यामुळे युवक आपल्या मित्राचे नेत्यापेक्षाही मोठा वाढदिवस साजरा करून आनंद घेतात. वाढदिवस हे निमित्त
असते त्यामागे मित्रपणा दडलेला असतो, त्यामध्ये गोडवा असतो, त्यामध्ये
उत्साह असतो, दैनंदिन जीवनात दररोज
कोणत्याना कोणत्या तरी मित्राचा वाढदिवस असतो त्यामुळे तो साजरा करण्यासाठी मित्रच
पुढे येतो. त्यामुळे असंख्य युवकांचे ग्रुप निर्माण होताना दिसतात युवकांची मोठी फळी
निर्माण झालेली दिसते. सध्या नेत्यांच्या वाढदिवसाला युवक जास्त महत्व देताना दिसत
नाहीत. परंतु मित्रांच्या वाढदिवसाला मित्र भरभरून प्रतिसाद देतात हे आश्चर्य म्हणावे
लागेल आणि ही काळाची गरज आहे. वाढदिवसातून मैत्री घट्ट होते, एक जीवाभावाचा मित्र बनतो तो आधार
वाटतो. सुखा: दुखा: ला मित्र धावून येतो हेच वाढदिवसाचे महत्व सांगते. मित्रच मित्राचे
वाढदिवस दररोज साजरे करताना त्या मित्रांच्या आनंदाला उधाण येते. सर्व मित्र रमून जातात
हा वाढदिवसाचा रम्य असा सोहळा आनंद देऊन जातो हे वाढदिवसाच्या निमित्ताने घडते इतकेच...!
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार