मा. श्री. बाबाराजे (दादा) देशमुख |
संपादक
कोरोना कोव्हिड
-१९ या रोगाचे शहर, गाव ,वाडी, वस्ती, वार्ड, गल्ली मध्ये कोरोना या रोगाची मोठ्या
प्रमाणात लागण होत असून नातेपुते हे गाव बाजारपेठेचे असून या गावाला जोडून असंख्य गावे
आहेत. या ग्रामीण भागातील गावात कोरोना या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात या भागात सापडत
असून या रूग्णाला बाहेर न जाता नातेपुते येथेच कोव्हिड उपचार केंद्र सुरू केले तर रुग्णाची
गैरसोय होणार नाही. आता पर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने दोन लाख रुपये खर्च तातडीने उभा
केला आहे असे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. बाबाराजे
(दादा) देशमुख यांनी सांगितले आहे. त्वरित जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी
कोरोना कोव्हिड केंद्रास मान्यता देऊन रुग्णाचे
होणारे हाल थांबवावे. तसेच नातेपुते येथे कोव्हिड सेंटर झाल्यास रूग्णाला याच ठिकाणी
चांगले उपचार मिळतील. माळशिरस तालुक्यातील पूर्व भागात अकलूज, महाळूंग येथे उपचार केंद्र सुरू
असून सोलापूर जिल्ह्याचे शेवटचे पश्चिम भागातील नातेपुते हे मोठे बाजारपेठेचे गाव आहे.
येथे कोव्हिड उपचार केंद्र सुरू झाल्यास रुग्णामधील भीती कमी होईल. यामुळे रुग्णांना
दुसरीकडे नेण्याचा प्रशासनाचा ताण कमी होईल. तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिति माळशिरस
सौ.स्मिता पाटील यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळी नातेपुते येथे कोव्हिड उपचार केंद्र
सुरू करण्याची चर्चा झाली. या उपचार केंद्रासाठी तातडीने निधी दोन लाख रुपये जमा केला
आहे. त्यामध्ये १) बाबाराजे (दादा) देशमुख ५०,०००/- रुपये २) अॅड. बी. वाय. राऊत सरपंच नातेपुते ग्रामपंचायत मार्फत ५०,०००/- रुपये ३) अॅड. डी. एन. काळे
५०,०००/- रुपये ४)बाहुबली
चंकेश्वरा ५०,०००/- रुपये असे मिळून
दोन लाख रुपये जमा केले. त्यासाठी लागणारा ऑक्सीजन पुरवठा करण्याचा ग्रामस्तरावर नियोजन
करण्यात आले. या कोव्हिड सेंटर मध्ये ५० बेड ची व्यवस्था होईल. यामध्ये कोरोना रोगाची
लागण झालेल्या महिला तसेच वयोवृद्ध व्यक्तीची सोय होणार आहे. तरी नातेपुते येथे कोव्हिड
सेंटरला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी त्वरित मान्यता द्यावी अशी मागणी बाबाराजे
(दादा) देशमुख साहेब यांनी केली.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार