Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

मी जे लिहतो ते माझे स्वतंत्र विचार असतात व निर्भिडपणे मांडणे हे माझे कर्तव्य समजतो

मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 

संपादक

          मी उच्च शिक्षण अत्यंत गरिबीतून घेतले. जवळपास ७०० लेखकांची पुस्तके, अनेक लेखकांचे लेख वाचले असून त्यामुळे मी अवांतर वाचन केले. त्यामुळे मला माझे विचार मवाळवादी असो वा जहालवादी त्यामध्ये परिवर्तनवादी, प्रबोधनवादी सामावलेले असतात. मी जे लिहतो त्यामध्ये कोणाचा द्वेष, मत्सर, टीका टिपणी, मतभेद असे काहीच नसते. पण मला एक चीड येत आहे की, खरे बोलणे, खरे लिहणे यावरती ०५/०३/२०१५ रोजी माझ्याच समाजातील काही मोजक्या समाजकंटकाने मी लिहलेल्या लेखावर आक्षेप घेऊन समाजात चुकीची माहिती पसरवून हल्ला केला. हल्ला केल्याने मी भीत नाही किंवा माझे विचार मेले नाहीत. हल्ल्यामुळे मी जोमाने सडेतोड विचार लिहण्यासाठी उलट मला बळ मिळाले. परंतु वाईट वाटते की, मी परिवर्तनवादी विचार मांडले होते त्यामध्ये गैर काही नव्हते असे असताना माझ्यावरती माझ्याच समाजाने हल्ला करावा ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे मी कधीही त्यांना माफ करणार नाही व कधीच चांगले म्हणणार नाही ही माझी भीम प्रतिज्ञा आहे असो. कोणावर काय लिहायचे हे मला चांगले समजते. माझ्या विचारात धमक आहे, माझ्या विचाराने समाजकंटक घायाळ होत असतील तर माझे विचार सडेतोड व निर्भिडपणे जे दिसेल तेच लिहतो ही माझ्या विचाराची सिदोरी मी समजतो. माझे विचार हे आजूबाजूला घडत असलेल्या, दिसत असलेल्या परिस्थितीवरती अवलंबून असतात. माझे विचार बहुजन समाजातील युवक वर्ग, वडीलधारी मंडळी, मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात वाचतात. माझे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मला आहे. माझे विचार वाचतील, सोडून देतील त्यामुळे “वाचकांचा” तिरस्कार मी करणार नाही. मी अभ्यासू वृत्तीने  विचार विषय निवडून लिहीत असतो त्यावरती प्रकाश टाकत असतो. चांगले विचार, चांगले काम पात्रताहीन लोकांना कधीच आवडत नसते हे ग्राह्य धरूनच मी लिहीत असतो. परंतु मी जे लिहतो त्याप्रमाणे शब्दाचा, वाक्याचा अर्थ मी आणि मीच सांगू शकतो एवढी माझ्याकडे थोडीफार बुद्धीमत्ता आहे. तलवारीने घायाळ करण्यापेक्षा पेनातील शाईने माझे विचार घायाळ करतात, परिवर्तन घडवितात. माझ्याकडे असलेली विचारसरणी त्यामध्ये प्रेरणादायी, स्पृतीदायी, आनंददायी विचाराची देवाणघेवाण असते. मी लिहीत असलेल्या विचारामुळे मला गर्व नाही. मला शाबासकी मिळेल. माझे मोठेपण होईल, माझे नाव होईल ही लक्षणे मला योग्य वाटत नाहीत व ती मला मान्य ही नाहीत. मी चालवीत असलेल्या पेनातील लेखणीतून जे शब्द, विचार लिहले जातात ते मला समाधान मिळवून देतात. सध्या तलवारीची क्रांति ही महत्वाची नसून विचाराची क्रांति महत्वाची आहे. माझे विचार हे विषयानुसार लेखणीतून लिहले जातात व बघताबघता लेख तयार होतो. योग्य, अयोग्य, प्रगति, अधोगती, परिस्थिती, घटना, प्रसंग, चालू घडामोडी यावरती लिहीत असतो. विचारधारा, संवाद हे महत्वाचे आहे त्यासाठी अवांतर वाचन करणे काळाची गरज आहे त्यामुळे बुद्धिमत्ता तेज राहते व आनंद मिळतो.

             जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार


Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...