संपादक
वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर या गावी कोरोना रोगाचा रुग्ण
सापडला असून त्या व्यक्तीच्या घराशेजारील व्यक्तींचे तपासणीचे काम जोराने चालू आहे.
गावात घरोघरी जाऊन तसेच वाडी वस्तीवर जाऊन आरोग्य कर्मचारी ग्रामस्थांची तपासणी करत
आहेत. कोरोना या रोगाचा रुग्ण आढळून आल्यामुळे वाखरी गावात व आसपासच्या परिसरात भीतीचे
वातावरण निर्माण झाले आहे. वाखरी गावात मास्क लावणारे मोजकेच ग्रामस्थ दिसत असून तसेच
शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे असे समजते. वाखरी गावात व वाडी वस्तीवर
पंढरपूर ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त जोरात चालू आहे. वाखरी गावातील आजूबाजूचे रस्ते
ग्रामस्थांनी अडवले आहेत. या कोरोना रोगाचा वाखरी गावावर शिरकाव झाला आहे त्यामुळे
सर्वत्र हाहाकार उडाला आहे. गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. गावात व परिसरात
घबराटीचे वातावरण पसरले आहे. वाखरी गाव पुर्णपणे सील केले आहे असे ग्रामस्थांनकडून
माहिती मिळाली आहे. यासाठी प्रांत अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी व त्यांचे कर्मचारी
ग्रामीण चे वरिष्ठ पोलिस अधिकारी व त्यांचे कर्मचारी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत मधील कारभारी दक्षता
घेत असल्याचे समजले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment