नातेपुते ता.
माळशिरस, जि. सोलापूर येथील कर्मयोगी
रघुनाथ (बापू ) उराडे यांची निधन वार्ता समजली खूप दु:ख झाले. बापूंचा प्रामाणिकपणा, सत्यपणा, सत्यवादी, मनमोकळेपणा निर्भिडपणे आपले विचार
मांडत असत. साधी राहणी, उच्च
विचारसरणी बापूंची होती. त्यांचे विचार परिवर्तनवादी व प्रबोधनवादी असत, रोखठोक न्यायाची बाजू घेऊनच न्याय
देणारे असे बापू होते. बापूंचा हात माझ्या पाठीवर शब्बासकी देऊन गेला. बापूंच्या जाण्याने
न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. बापू लहान थोरांचे आदर्श होते. त्यांच्या जाण्याने
जो त्यांच्या कुटुंबावर आघात झाला तो आघात पचवण्याची ताकत परमेश्वराने त्यांच्या कुटुंबांना
द्यावी. तसेच बापूंच्या आत्म्यास शांति लाभू ही ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या दु:खात
माझा आठवले परिवार सामील होत आहे.
नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक
उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

Comments
Post a Comment