Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

नातेपुते येथे गरीब व गरजूंना आर्थिक सहाय्य करण्यासाठीच श्री. रामहरी रूपनवर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना – माजी आमदार रामहरी रूपनवर

श्री. रामहरी रूपनवर नागरी सहकारी पतसंस्थेच्या उदघाटनप्रसंगी  प्रकाश पाटील पंढरपूर, बाबाराजे (दादा) देशमुख, माजी आमदार रामहरी रूपनवर, प्रकाश पाटील पाणीव, अॅड. डी. एन. काळे, संतोष काळे इ.  

संपादक

          नातेपुते तालुका माळशिरस, जि. सोलापूर येथे श्री. रामहरी रूपनवर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. या पतसंस्थेचे उदघाटन सुधाकरपंत परिचारक, पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील पंढरपूर, माजी आमदार रामहरी रूपनवर, रेणुका परिवाराचे नेते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. बाबाराजे (दादा) देशमुख यांच्या हस्ते फीत कापून झाले. माजी आमदार रामहरी रूपनवर म्हणाले की, सध्या कोरोना या रोगाने थैमान घातले असून मोठी आर्थिक अडचण झाली आहे ही पतसंस्था गरीब व गरजू लोकांना अर्थसाहय्य करणारी आहे. या संस्थेत तीन हजार सभासद झाले आहेत. ह्या पतसंस्थेला अॅड. डी. एन. काळे वकील यांनी जागा दिल्यामुळे व या ठिकाणी धुळदेव पतसंस्थेने यशस्वी वाटचाल केली असल्यामुळे आमच्या पतसंस्थेला ही जागा यशस्वी ठरेल व चांगली वाटचाल करेल असे पतसंस्थेचे चेअरमन माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी केले. या उदघाटन प्रसंगी प्रकाश पाटील पंढरपूर म्हणाले की, ३0 ते ३६ हजार पतसंस्था कार्यरत होत्या. सध्या त्यापैकी १० हजार पतसंस्था राहिल्या असतील. नोटाबंदी मुळे आर्थिककणा मोडला आहे. ठेवीदार कधी येथील, कर्जदार कधी कर्ज फेडतील हे सांगता येत नाही. पतसंस्था चालवताना सगळा विचार करावा लागत आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष रेणुका परिवाराचे नेते मा. बाबाराजे (दादा) देशमुख म्हणाले की, श्री. रामहरी रूपनवर नागरी पतसंस्थेच्या स्थापनेवेळी प्रकाश पाटील पंढरपूर व प्रकाश पाटील पानिव तालुका माळशिरस हे दोन प्रकाश पतसंस्थेवेळी हजर असल्यामुळे प्रकाश पडेल व चांगली चालेल यामध्ये शंका नाही, पतसंस्था यशस्वी होईल. नातेपुते येथील पतसंस्था कधीच स्पर्धा करीत नाहीत. एकमेकांना सहकार्य करीत आहेत. ही पतसंस्था वैभव निर्माण करील असे बाबाराजे (दादा) देशमुख म्हणाले. यावेळी कोंग्रेस कमिटिचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, शुभांगी देशमुख, शिरीष फडे, सरपंच बी. वाय. राऊत, अॅड. डी. एन. काळे, मछिंद्र ठवरे, धैर्यशील देशमुख, डॉ. एम. पी. मोरे,  सोपानराव नारनवर, संजय पाटील, मामासाहेब पांढरे, माऊली पाटील, अतुल पाटील, अर्जुन जठार, बाहूबली चेंकेश्वरा, अॅड. भारत उराडे, गौतम माने, राजाभाऊ रूपनवर, के. पी. काळे, आप्पासाहेब रूपनवर, संतोष काळे, बाळासाहेब पांढरे, अविनाशजी दोशी, तुकाराम देशमुख, अरुण पांढरे, प्रा. एम. डी. ढोबळे, डॉ. आजिनाथ रूपनवर, दादा पाटील, महादेव देशमुख, शामराव बंडगर इ. मान्यवर उपस्थित होते.        
 
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
 


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...