Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

नातेपुते व इतर परिसरातील गावामध्ये मास्क गळ्यात आणि तोंड उघडे असे सर्वत्र भयानक परिस्थिती

संपादक

    नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर या गावात ५० % घराबाहेर पडणारे ग्रामस्थ आहेत. तसेच घरातून बाहेर पडणारे मोकाट टाइमपास म्हणून फिरणारे ग्रामस्थ यांच्याकडे पाहिले असता गळ्यात मास्क आणि तोंड उघडे बघायला मिळत आहेत. नातेपुते गावात कोरोना या रोगापासून गाव, ग्रामस्थ आनंदी रहावे, कोणतीही विचित्र घटना घडू नये, कोणावरही या रोगाचे संकट येऊ नये यासाठी ग्रामपंचायत, नातेपुते पोलिस स्टेशन सतत दक्ष आहेत. नियम मोडू नका, आदेशाचे पालन करा असे सांगितले जाते पण या आदेशाकडे काही ग्रामस्थांचे लक्ष नाही ही शोकांतिका आहे. तसेच नातेपुते पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या गावामध्येही अशीच भयानक परिस्थिती आढळत आहे. जे गळ्यात मास्क तोंड उघडे अशी जी व्यक्ति करीत असेल तर पोलिस खात्याने दांडक्याचा प्रसाद दिलाच पाहिजे कारण कोरोना या रोगाची लागण नातेपुते या गावात झाली तर करोना या रोगाचे ढीग लागतील याचा विचार जनतेने केला पाहिजे. मास्क हा गळ्यात अडकवण्यासाठी नाही तर तोंडातून हवेद्वारे पडणारे सूक्ष्मजंतु थांबवण्यासाठी आहेत. बाबांनो मास्क गळ्यात अडकावू नका तोंडावर बांधा तसेच दरोरज सकाळी काही ग्रामस्थ घरातून बाहेर पडून एस. टी. स्टँड च्या रस्त्यालगत बसून गप्पा मारताना दिसत आहेत. त्यांच्याकडे पाहिले असता व इतरांकडे पाहिले असता गळ्यात मास्क आणि तोंड उघडे असे दिसले. मास्क गळ्यात अडकावणे फॅशन नाही तर सुरक्षित राहण्यासाठी घरगुती उपचार आहे. तरी आपली जबाबदारी समजून वागावे. मास्क गळ्यात तोंड उघडे ही परिस्थिति तुम्हाला व इतरांना संकट आणू शकते. मास्क बांधायचा नसेल तर घर सोडू नका. कोरोनाचा धाक आणि डोक्याला ताप अगोदरच झाला आहे. सावधगिरी बाळगा, दक्षता घ्या, विनाकारण भटकंती करू नका. कोरोना या रोगापासून अलिप्त राहायचे व कोरोना रोगालाही अलिप्त ठेवायची सर्वांची जबाबदारी आहे. तरी मास्क गळ्यात तोंड उघडे असे करू नका

जनहितार्थ   

संपादक

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...