Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

कोरोना कोव्हिड-19 या काळातील लॉकडाऊनचा फायदा नाही तर तोटा झाला आहे, मायबाप सरकारने जनतेला वेठीस धरू नये


संपादक

          मार्च पासून देश, राज्य, जिल्हे, तालुके, शहरे, गाव कोरोना कोव्हिड -19 या रोगामुळे लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी सतत चालू आहे. शासनाचे आदेश व जनतेचे हाल अशी परिस्थिति सध्या चालू आहे. ज्या जनतेने लाख मोलाचे पवित्र मत दिले त्याच जनतेची आज उपासमार चालू आहे. कोरोना हा रोग वाटला होता आज पर्यंतच्या रोगापेक्षा भयंकर हा रोग आहे पण यामध्ये काही तथ्य नाही ही अफवा आहे असे माझे मत आहे. विनाकारण सरकारने या रोगाला प्रमाणापेक्षा जास्त महत्व दिले. हा रोग औषध, गोळ्या, इंजेक्शन, हजारो लाखो रुपये किमतीच्या औषध वापरुन बरे करीत आहेत असे काही नाही तर एकांतपणा म्हणजेच क्वारंटाईन केले जाते त्यामुळे रुग्ण आपोआप बरा होतो. कोरोना झालेल्या व्यक्तीला महागडे किमतीची औषध, गोळ्या, इंजेक्शन दिले जात नाही फक्त बंदिस्त ठेऊन ताप, थंडी, सर्दी, खोकला, गर्दी, मळमळ, अंगदुखी, डोकेदुखी, शुगर, बीपी इ. आहेत म्हणून त्या व्यक्तिला कोरोना रोग झाला असे बनवले जात आहे. आज जनतेला घाबरून सोडण्याचे काम सध्या चालू आहे. राज्यकर्त्यांनी भीती दाखवायची जनतेनी ती बाळगायची यापलीकडे काय आहे? अच्छे दिनाचे गाजर दाखवले, जनतेने भरभरून मत दिली, देश, राज्य ताब्यात दिली. राज्यकर्त्यांना सोन्याचे दिवस आणि जनतेला उपासमारीचे दिवस आणले त्यामध्येही कोरोना कोव्हिड -19 या रोगाचा प्रवेश आधीच धूर त्यामध्ये या रोगाचा भडका जनतेने करायचे काय? व्यवहार ठप्प झाले, छोटे–मोठे व्यवसाय बंद पडले, उद्योगधंदे बंद पडले, छोटे-मोठे व्यवसाय करता येईना, मुला-मुलींच्या लग्नाची आई वडिलांना काळजी, शेतकर्‍यांच्या मालाला किंम्मत नाही, शेतमजुरांना काम मिळेना, शिक्षण संस्था उध्वस्त झाल्या एवढी हालत कोरोना या रोगाची लागण म्हणून जनतेला वेठीस सरकारने धरले आहे. लॉकडाऊन मुळे देश व देशातील जनता बरबाद होत आहे. देशाची व देशातील जनतेचा तोटा होत आहे. जनतेला जिवंतपणी मरण डोळ्यासमोर दिसत आहे. देशात या रोगापेक्षा अनेक रोग आले आणि तेल लावत गेले पण ना त्याची आठवण ना त्यांनी केला जनतेचा तोटा. या देशातील जनतेला राज्यकर्त्यांनी डोलायला, मान हलवायला, थाळ्या वाजवायला कोरोना या रोगाची भीती बाळगायला असे आदेश काढले ते जनतेने स्वीकारले. गाजराचा हलवा खायचा नाही, गाजर फक्त हलवायचे या पलीकडे जनतेच्या हातात सध्या काही नाही. राज्यकर्त्यांनी पुंगी वाजवायची, जनतेनी त्यावर डोलत राहायचे, नाचायचे, काय होणार आणि कसे होणार या जनतेचे? ज्या भागात रुग्ण सापडला तेवढाच भाग व त्या भागातील व्यक्ति त्यांची तपासणी केली पाहिजे परंतु एक रुग्ण सापडतो हजारो, लाखो कुटुंबांना वेठीस धरले जाते. ज्या भागात रुग्ण सापडला आहे त्यावेळीस ग्रामस्थांशी चर्चा करून गाव बंद किंवा त्या भागालाच शील करावे. जनतेला वेठीस धरू नये, जनतेची थट्टा करू नये, जनतेची वाट लावू नये, जो रुग्ण सापडला त्यालाच बंदिस्त करा व त्या भागातील व्यक्तीची तपासणी करा, त्या कुटुंबांना तेथेच ठेवा. मायबाप सरकार नका करू जनतेवर अन्याय, अत्याचार,बळजबरी, जुलूम, हिटलरशाही. लॉकडाऊनमुळे देशाचा व जनतेचा या कोरोना काळात फायदा झाला नाही तर प्रचंड तोटा झाला आहे. लॉकडाऊन उठवणे ही काळाची गरज आहे. जनतेला सुखाने जगू द्या.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...