Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

कोरोना कोव्हिड -१९ या रोगाची शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी माझ्या शरीरावरती जनतेच्या हितासाठी टेस्ट करावी

मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

संपादक

          मी संपादक अभिमन्यु बी. आठवले आज जे जनतेच्या मनात धडकी व भीती कोरोना रोगाची आहे. केवळ ताप, थंडी, सर्दी, गर्दी, घसा खवखवणे, मळमळ करणे, तापमान कमी जास्त होणे. माणसाच्या शरीरात जन्मापासूनच ही लक्षणे असतात. ती या कोरोना कोव्हिड -१९ च्या रोगाच्या काळात आली असे नाही. कोरोना हा रोग त्या व्यक्तीच्या शरीरात कुठे आणि कसा लपतो आहे? तो शरीराच्या कोणत्या भागाची पोखरणी करीत आहे? या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीचे फोटो यंत्रसामोग्रीच्या सहाय्याने जनतेसमोर शास्त्रज्ञ व डॉक्टर यांनी जनतेसमोर आणावेत. तसेच कोरोना या रोगाची लागण झालेली व्यक्ति व मी अभिमन्यु बी. आठवले एकत्र एकाच ताटात जेवतो, समोरासमोर चर्चा करतो, त्यावेळी त्या रुग्णाची लागण मला होईल का? मी माझे शरीर कोरोना टेस्टसाठी देण्यास तयार आहे. माझ्या कुटुंबाचा विचार न करता जनतेच्या हितासाठी शास्त्रज्ञ व डॉक्टर यांनी माझ्या शरीरावर टेस्ट करावी अशी माझी विनंती आहे. मला मरण आले तरी जनतेच्या हितासाठी सार्थक ठरेल अशी माझी शास्त्रज्ञ व डॉक्टर यांनी टेस्ट करून रीपोर्ट पॉझिटिव्ह हा रोग दूरचित्रवाहिणी वरुन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना या रोगाची झालेली लागण याचे प्रात्यक्षिक करून जनतेच्या हितासाठी व भल्यासाठी करण्यात यावे. केवळ ताप, थंडी, सर्दी, गर्दी, घसा खवखवणे, मळमळ होणे, शरीरातील तापमान कमी जास्त होणे अशी लक्षणे सोडून कोरोना हा रोग कसा व कुठे शरीरात आहे ते दाखवण्याचे काम शास्त्रज्ञ व डॉक्टर यांनी करावे. जनता या रोगामुळे भयभीत झाली आहे, उद्योगधंदे नाहीत, पैसा नाही, पोट भरण्यासाठी पुरेसे अन्नधान्य नाही केवळ वरील लक्षणे दिसली म्हणून कोरोना हा रोग झाला या वरती माझा विश्वास नाही. एकदा कधीतरी मरायचे आहे. मग जनतेने उपासमारीने मरण्यापेक्षा जनतेच्या हितासाठी माझ्या शरीरावरती कोरोना या रोगाची टेस्ट करा. ज्या व्यक्तीला ताप, थंडी, सर्दी, चक्कर येणे असे असेल तर कोरोना पॉझिटिव्ह कशासाठी अफवा आहे असेच मी समजतो. जनतेला वेदना देण्यासाठीची या कोरोना रोगाची भीती दाखवली जात आहे असे माझे मत आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या महिन्यात माणसाच्या शरीर क्षमतेनुसार शरीर थकत असते. या कोरोना रोगाची भीती दाखवण्याचेच काम चालू आहे असेच वाटते. जनतेला मिळालेले आयुष्य आनंदी  घालवण्यासाठी त्यांना जगूद्या. तसेच कोरोना या रोगाची लागण झालेला व त्याच्या पासून माझ्या शरीरात कसा हा रोग शिरकाव करतो त्यासाठी टेस्ट व्हावी व तीच टेस्ट प्रसिद्धीच्या माध्यमातून जनतेसमोर आणावी म्हणजे कळेल की, नक्की कोरोना हा रोग कसा आहे? त्याचा रंग कसा आहे? तो  माणसाच्या शरीरात कोठे शिरकाव करतो हे आढळून येईल. तरी जनतेला वेठीस धरण्यास अर्थ नाही. माझ्या शरीरावर शास्त्रज्ञ व डॉक्टर यांनी टेस्ट करावी हे माझे पवित्र काम जनतेच्या हितासाठीच असेल असे मी मानतो.

          तसेच सरकारनेही माझे शरीर कोरोना या रोगाची टेस्ट करण्यासाठी घ्यावी.  

          जनहितार्थ.

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...