Skip to main content

Posts

Showing posts from 2020

नातेपुते ग्रामपंचायत वार्ड क्र.३ मधील देशमुख पाटील युतीचे उमेदवार मा.अतुल (बापू) राजेंद्र पाटील व याच युतीतील उमेदवारांना ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा

संपादक सन २०२०-२१ या कालावधीमध्ये लागलेल्या नातेपुते ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र. ३ मधील देशमुख पाटील युतीचे मा. अतुप (बापू) राजेंद्र पाटील (ग्रा. प.मा. उपसरपंच) यापूर्वी उपसरपंच म्हणून काम केले आहे व याही वेळेला वार्ड क्र. ३ मधून उमेदवार म्हणून निवडणूक देशमुख-पाटील युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत व इतरही या युतीचे उमेदवार रिंगणात आहेत. अतुल पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले की , गावातील ग्रामस्थांच्या व गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी निवडणूक लढवित आहे व माझ्या सोबत युतीचे उमेदवार आहेत. वार्ड क्र. ३ मधील ग्रामस्थांनी यावेळेला स्वच्छ व पारदर्शी कारभार करण्यासाठी आम्हाला मतदान करावे. यावेळेला वार्ड क्र. ३ मधील असंख्य ग्रामस्थ हजर होते व त्या सर्व ग्रामस्थांनी देशमुख पाटील युतीचे उमेदवार मा. अतुल(बापू) राजेंद्र पाटील व इतर उमेदवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या देशमुख-पाटील युतीचे काही उमेदवार बिनविरोध झाले आहेत व यापुढेही या युतीचे उमेदवार ग्रामस्थांच्या मताने निवडून येतील व ग्रामपंचायत मध्ये स्वच्छ व पारदर्शी गावाचा विकास व गावातील जनतेचे कामे करतील असे असल्यामुळे वार्ड क्...

केंद्र सरकारने शेतकरी यांची मागणी मान्य करून शेती विरोधी कायदा रद्द करावा.

 संपादक  दि. ०८/१२/२०२० रोजी शेतकरी यांच्या विरोधात  केंद्र सरकारने कायदा केला आहे. शेतकरी यांचावर अन्याय आहे त्यामुळे तो कायदा त्वरित रद्द करणे गरजेचे आहे. ज्या शेतकरी बांधवांनी केंद्रात व राज्यात आपले पवित्र मत देवून राज्यकर्ते बनविले त्याच शेतकरी , कष्टकरी व तमाम जनतेवरती अन्याय करण्याचे सुरू आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी भारतातील जनतेला अच्छे दिनाचे गाजर दाखविल्यामुळे जनतेने विश्वास ठेवला त्याच मतदार राजावरती अन्याय चालू आहे. केवळ सत्ता मिळाल्यामुळे केंद्र सरकारने शेतकर्‍यावरती अन्याय करू नये त्यांच्या व्यथा वेदना समजावून घेऊन कायदा रद्द करावा. त्यांची मागणी मान्य करावी. शेतकरी यांनी पुकारलेल्या भारत बंद ला बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेचा पाठिंबा.   बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार

नातेपुते पोलिस स्टेशन च्या वतीने पोलिस पाटलांना “कोव्हिड योद्धा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच पत्रकारांना फराळाचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले

संपादक           नातेपुते ता. माळशिरस , जि.सोलापूर पोलिस स्टेशन च्या वतीने करोना कोव्हिड-१९ या आपत्ती काळात ज्या पोलिस पाटील यांनी चांगली कामगिरी पार पाडली त्यांना “कोव्हिड योद्धा” म्हणून गौरवण्यात आले. सोलापूरचे तत्कालीन पोलिस अधिक्षक मनोज पाटील व अप्पर पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल झेंडे यांच्या संकल्पनेतून पोलिस पाटलांना कोव्हिड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. त्याच पद्धतीने पत्रकारांनाही दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले. यावेळी नातेपुते पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी मनोज सोलनकर साहेब , शिवकुमार मदभावी , बबलू गाडे , पोलिस स्टेशन चे सर्व अधिकारी , पोलिस पाटील व तसेच सर्व पत्रकार उपस्थित होते. सर्व भारतीय बांधवांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा...! बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले प...

सोलापूर विभागीय कार्यालय ता.पंढरपूर (वाखरी) साप्ताहिक बहुजन भूषण येथील कार्यालयात पाणीच पाणी

संपादक           पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा वाखरी गाव हे पुणे पंढरपूर रोड वर असून त्या गावात पंढरपूर येथील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे वाखरी गावातील काही घरामध्ये व दलित कुटुंबाच्या घरामध्ये पाणी शिरल्याने तेथील कुटुंबे भयभीत झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ वाखरी येथील शाळा , पालखी मैदान येथे कुटुंबांना स्थलांतर केले आहे. तसेच सोलापूर विभागीय कार्यालय पंढरपूर (वाखरी) बहुजन भूषणचे वृत्तपत्राच्या कार्यालयात पाणी शिरले आहे. भीमा नदीला १३ वर्षानी अशी पुर परिस्थिती आल्यामुळे दैनिय अवस्था निर्माण झाली आहे. सर्व जनतेने स्वत:ची कुटुंबाची काळजी घ्यावी. संकटामागुन संकटे येत आहेत. देशावर राज्यकर्त्यांचे संकट , कोरोना व इतर रोगांचे संकट तसेच पावसामुळे आलेले महापुराचे संकट , जनावरे व मानव जातीसाठी शाप ठरत आहेत. वाखरी ग्रामपंचायतचे प्रशासक अधिकारी , ग्रामसेवक , तलाठी , कर्मचारी , यांनी सतर्क रहावे. पुरामुळे झालेले शेतकर्‍याचे पिकाचे पंचनामे , घरात पाणी शिरल्यामुळे झालेले नुकसान त्याचे पंचनामे करून त्यांना त्वरित मदत देण्यासाठी सतर्क रहावे. तसेच...

श्री. बालयोगी महाराज यांच्या मूर्तिची स्थापना संपन्न

  श्री बालयोगी महाराज संपादक           श्रीबालयोगी महाराज यांचा जन्म श्री पिता नानासाहेब तातोबा भोसले व मातोश्री सौ. रतनबाई नानासाहेब भोसले यांचापोटी श्रीबाल योगी महाराज यांचा जन्म झाला. जन्माला आल्यापासुन बाबांनी घरदार सोडून दर्‍या-खोर्‍या , डोंगर , जंगल येथेच राहायचे. बाबा हेच बाळ घेऊन आई वडील समवेत भटकंती करीत चारोधाम यात्रा पूर्ण केली. बाबांना गगनगिरी महाराजावरती प्रचंड श्रद्धा होती श्री. बालयोगी महाराज यांना शाळा माहिती नव्हती तरीपण शाळेत न जाता बाबांना हिंदी , इंग्रजी , तेलगू , कन्नड अशा विविधी भाषा बोलता येत असत असे त्यांचे आई वडील व भाऊ व भक्त सांगत आहेत. बाबा शाळेत गेले नाहीत पण त्यांनी केलेले लिखाण मी स्वत: संपादक या नात्याने त्यांच्या वहीत लिहलेले पाहिले आहे. बाबांची भक्ति रंजल्या गांजल्यांना आनंदाचे , सुखाचे दिवस लाभावेत यासाठीच त्यांचा जन्म झाला असावा असे भक्त सांगतात. बाबांचे निधन हे सर्वांसाठी हळहळ करणारे आहे. भक्तांना वाटते की , बाबांचे निधन झाले नसून ते या पृथ्वीतलावर अजरामर आहेत , प्रत्येक हृदयात आहेत. बाबांच्...

मनसे आमदार मा. राजु दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले

मनसे आमदार मा. राजु दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नातेपुते येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथील सभागृहामध्ये ३०/०९/२०२० रोजी भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते. " महाराष्ट्र कोरोना मुक्त हाच संकल्प" वाढत्या कोरोनाचा पादूर्भव महाराष्ट्र भर होत असल्याने कोरोनाग्रस्त यांना रक्त पुरवठा मोठ्या प्रमाणात मिळवा. हा संकल्प महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आहे. या शिबिराचे आयोजन मनसे विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष अक्षय बावकर व MNS YOUTH TEAM   नातेपुते यांनी केले होते.         या शिबिरात रक्तदात्यास कोरोना पासून वाचण्यासाठी वाफेचे मशिन , सॅं नि टा यझर व मास्क या वस्तू देण्यात आल्या. रक्तदान शिबिराचे उदघाटन मनसे तालुका अध्यक्ष मा. सुरेश भाऊ टेळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सुरेश भाऊ टेळे यांनी कार्यक्रमाचे   कौतुक केले. व कार्यकर्त्यांचे आभार मानले. व यावेळी उपस्थित मनसे तालुका संघटक अजित पवार , मनसे तालुका उपाध्यक्ष बाबा ननवरे , तालुका कार्यध्यक्ष मनोज लांडगे , विद्यार्थी से...

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध

  उत्तरप्रदेशातील हाथरस येथे तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि त्यात तिचा झालेला मृत्यू असे कृत्य करणार्‍या त्या नराधमांना न्यायालयीन आसरा नको तर त्यांना भरचौकात आणून त्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत हिच शिक्षा योग्य आहे. ही घटना गंभीर व वेदनादायी व चीड आणणारी आहे , ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जाहीर निषेध करीत आहे.     टीप : जे दिसले , अनुभवले , पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र , बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. निषेध संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार

साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे

  वैभव आठवले  संपादक            साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे २९/०९/२०२० रोजी तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे. सर्व व्यवसायधारक , सामाजिक , राजकीय , शिक्षणक्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे , आशीर्वाद दिला आहे हे माझ्यासाठी बळ आहे. जे दिसेल तेच लिहणे हे माझ्या वृत्तपात्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. कोरोना या काळात अंक काढणे अवघड झाले असल्यामुळे अंक काढला गेला नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या विचाराची शिदोरी सोशल मीडिया मधून वाचकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. कोरोना या रोगाचा काळ चालू आहे. हा रोग संपुष्टात येऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...! आपण आपली सामाजिक कामे , पक्षाकडून निवड , गणेश मंडळाच्या वतीने केलेली कामे अशा सर्व स्थरातील कार्यकर्त्यांनी “ ना नफा ना तोटा” यावरती आधारित आपले काम माझ्या वृत्तपत्रातून देवून प्रसिद्धी करणार आहे. आपण आपले लेख , विचार , कविता , भ्रष्टाचार इ. विषयावर लेखन करून तसेच आपल्या व्यवसायाच्या जाहिराती देवून सहकार्य करावे. दिव...

“कोरोना काही जाईना संकट काही टळेना” भारत सरकारने या देशातील ज्या योजना सुरू आहेत त्या बंद करून त्या योजनेसाठी होणारा खर्च या देशातील जनतेसाठी वापरुन जनता जगवावी

  संपादक           कोरोना कोव्हिड-१९ या   रोगाची दिवसेंदिवस वाढ होत आहे यामुळे जनता हैराण झाली आहे. कसे जीवन जगावे असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागत आहेत. त्यामध्ये सरकारचे लॉकडाऊन , संचारबंदी , जमावबंदी हे आदेश काय करावे जनतेने ? जनतेला जगवण्यासाठी सरकारची जबाबदारी दिसून येत नाही. केवळ ताप , थंडी , सर्दी , गर्दी , तापमान कमी जास्त होणे , अंग दुखणे , दमा , शुगर , बीपी इ. लक्षणे प्रत्येक माणसामध्ये दिसून येत आहेत. परंतु ही लक्षणे आढळली म्हणून त्या व्यक्तिला कोरोना या रोगाचा रुग्ण म्हणून क्वारंटाईन केले जाते ही चिंताजनक बाब आहे. भारत सरकारने या देशात विविध योजना राबवत आहेत. त्या योजना बंद करून त्या योजनेला येणारा खर्च तो जनतेसाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मानसी १०००/- रु. प्रमाणे त्यांना देऊन जगवावे त्यामुळे निदान जनता सुखी होईल. माणस मरत असतील तर त्या योजना बघणार कोण ? त्यामुळे भारत सरकारने जनतेचे हित पहावे. भारत सरकारने सर्व योजना बंद कराव्यात त्या निधिचा कोरोना या अपत्य काळा...

मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर भारत देशातील जनतेसाठी “बापमाणूस” आहेत

मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर   संपादक           घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू   मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर म्हणजे या भारत देशातील जनतेसाठी सध्याचे “बापमाणूस” आहेत. स्वाभिमानी नेता , दिनदुबळ्यांचे कैवारी , प्रत्येक भारतीयांच्या हृदयात स्थान असलेले एकमेव नेते म्हणजे प्रकाशजी म्हणजे तथा बाळासाहेब आंबेडकर आहेत. रडण्यापेक्षा लढण्यात मजा असते. मागे लागून आमदार , खासदार होणे म्हणजे एक लाचारी असे साहेबांचे मत असते. साधी राहणी , उच्च विचार सरणी , कधी गर्व नाही असा सर्वांचा नेता आधार म्हणजे बापमाणूस प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर. दिलेला शब्द पाळणारे “ना भय ना भीती” बाळगणारे असे श्रेष्ठ साहेब आहेत. माझा प्रत्यके जातीपातीचा , धर्माचा बांधव आज वंचित राहिला आहे त्यांना न्याय मिळत नाही , त्यांचावर अन्याय अत्याचार होतात म्हणून एक धाडसी , विद्वान , झुंजार नेते म्हणून ओळख असलेले मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून वंचित आ...

श्री गणेश प्रतिष्ठान यांच्याकडून सौ. पदमन (वाडकर) मॅडम (आरोग्य सेविका) यांना “कोव्हिड योद्धा” सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले

संपादक           नातेपुते येथील श्री गणेश प्रतिष्ठान यांच्याकडून  सौ. पदमन मॅडम (आरोग्य सेविका) यांना “कोव्हिड योद्धा” सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.   श्री गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर (दादा) अटक यांनी कोरोना या काळात अहोरात्र झटत असलेल्या आरोग्य सेविका यांचा सन्मान केला. यावेळी श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्हारी गवळी , उपाध्यक्ष आदेश पवार , जयश्री अटक तसेच श्री गणेश प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. *बातमी* *अधिक जाहिरातीसाठी संपर्क* संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार

साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे संस्थापक संपादक मा. श्री. अभिमन्यु बी. आठवले यांना "कोरोना योद्धा" पुरस्काराने सन्मानित

मा. सौ. यशश्री प्रमोद पाटील संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलिस पत्नी संघ यांचाकडून साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे संपादक निर्भिड पत्रकार व तसेच संस्थापक बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य श्री. अभिमन्यु बी. आठवले यांना “कोरोना योद्धा” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार  

जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर साहेब यांच्याकडे कोरोना या रोगाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी नातेपुते येथे कोव्हिड उपचार केंद्र सुरू करावे यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. बाबाराजे (दादा) देशमुख यांची मागणी

मा. श्री. बाबाराजे (दादा) देशमुख  संपादक           कोरोना कोव्हिड -१९ या रोगाचे शहर , गाव , वाडी , वस्ती , वार्ड , गल्ली मध्ये कोरोना या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण होत असून नातेपुते हे गाव बाजारपेठेचे असून या गावाला जोडून असंख्य गावे आहेत. या ग्रामीण भागातील गावात कोरोना या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात या भागात सापडत असून या रूग्णाला बाहेर न जाता नातेपुते येथेच कोव्हिड उपचार केंद्र सुरू केले तर रुग्णाची गैरसोय होणार नाही. आता पर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने दोन लाख रुपये खर्च तातडीने उभा केला आहे असे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. बाबाराजे (दादा) देशमुख यांनी सांगितले आहे. त्वरित जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी   कोरोना कोव्हिड केंद्रास मान्यता देऊन रुग्णाचे होणारे हाल थांबवावे. तसेच नातेपुते येथे कोव्हिड सेंटर झाल्यास रूग्णाला याच ठिकाणी चांगले उपचार मिळतील. माळशिरस तालुक्यातील पूर्व भागात अकलूज , महाळूंग येथे उपचार केंद्र सुरू असून सोलापूर जिल्ह्याचे शेवटचे पश्चिम भागातील नातेपुते हे मो...

ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे त्यावरती सामाजिक कार्यकर्त्याची प्रशासक म्हणून नेमणूक करावी यासाठी शासनाने आदेशाचे परिपत्रक काढावे

संपादक           महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे. सध्याच्या या कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका घेणे योग्य नाही असे शासनाचे मत आहे त्यामुळे त्याच गावातील स्वच्छ , पारदर्शी , उच्चशिक्षण , एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता असे असलेला त्याच गावातील ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्या सामाजिक कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांनाच तो अधिकार असावा. त्यामध्ये राजकीय पुढार्‍यांचा हस्तक्षेप नको. प्रशासक नेमताना तो अडाणी , कमी शिकलेला , अवैध धंदे करणारा व गुन्हेगारी वृत्तीचा नसावा. त्यागावातील जनतेच्या अडीअडचणी सोडविणारा गावाचा विकास करणारा व त्या विकासाची माहिती असणारा असावा. ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला आहे त्यातील कोणत्याही सरपंच , उपसरपंच , सदस्य यांना अधिकार देऊ नयेत व प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये असे वाटते. सामाजिक कार्यकर्त्याला प्रशासक म्हणून नेमण्यात यावे तसेच पोलिस पाटला सारखी परीक्षा प्रशासक पदासाठी घेण्या...

वाढदिवसातून मैत्री घट्ट बनते

  संपादक           सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या जन्म तारखा समजत असून त्यामुळे आपल्या मित्राचे , नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी मित्रच मित्रासाठी एकत्र येऊन वाढदिवस साजरे करीत असतात हा अविस्मरणीय क्षण असतो. या वाढदिवसामुळे एकसंघपणा , एकीचेबळ निर्माण होताना दिसते. पूर्वी नेत्यांच्याच वाढदिवसाला युवक वर्ग जायचा सध्या तशी परिस्थिति राहिली नाही. नेत्याला मागे टाकून आपले मित्रच , आपले नेते , सामाजिक कार्यकर्ते असे समजून एकमेकांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करताना दिसतात खूप बरे वाटते. या वाढदिवसामुळे जात , पात , धर्म असा भेदभाव उरत नाही. सर्व मिळून मित्रच मित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवस साजरा करतात. प्रत्येकाच्या चेहरावरती आनंद दिसून येतो. सर्व मित्र मंडळी अगदी मित्राच्या वाढदिवसामुळे खुश असताना दिसतात. सध्या मित्र आपल्या मित्राचे वाढदिवस नेत्यांच्या वाढदिवसापेक्षाही जोरात साजरे करतात. नेत्यांच्या वाढदिवसाला सध्या युवकांची पसंती दिसत नाही मात्र मित्रांच्या वाढदिवसाला मित्रांची पसंती मोठ्या प्रमाणात दिसत...