वैभव आठवले |
संपादक
साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे २९/०९/२०२०
रोजी तिसर्या वर्षात दमदार पदार्पण होत आहे. सर्व व्यवसायधारक,
सामाजिक, राजकीय, शिक्षणक्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील
व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे, आशीर्वाद दिला आहे हे माझ्यासाठी बळ आहे.
जे दिसेल तेच लिहणे हे माझ्या वृत्तपात्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. कोरोना या काळात अंक
काढणे अवघड झाले असल्यामुळे अंक काढला गेला नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून
मी माझ्या विचाराची शिदोरी सोशल मीडिया मधून वाचकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील
राहिलो. कोरोना या रोगाचा काळ चालू आहे. हा रोग संपुष्टात येऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...!
आपण आपली सामाजिक कामे, पक्षाकडून निवड,
गणेश मंडळाच्या वतीने केलेली कामे अशा सर्व स्थरातील कार्यकर्त्यांनी “ना
नफा ना तोटा” यावरती आधारित आपले काम माझ्या वृत्तपत्रातून देवून प्रसिद्धी करणार आहे.
आपण आपले लेख, विचार, कविता, भ्रष्टाचार इ. विषयावर लेखन करून तसेच आपल्या
व्यवसायाच्या जाहिराती देवून सहकार्य करावे. दिवाळी अंकात आपले सामाजिक काम आम्ही प्रसिद्धी
करून अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी आमची भूमिका राहील. तुमचे सहकार्य हेच माझ्या
वृत्तपत्रासाठी मौल्यवान देणगी व वरदान आहे. बहुजन भूषण या वृत्तपत्राचे तिसर्या वर्षात
दमदार पदार्पण होत आहे. यापुढेही संपदकाचे निर्भिड व सडेतोड विचार आपणास यापुढील काळात
वाचावयास मिळतील. आपणा सर्वांना या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आठवले
परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा...!
टीप
: जे दिसले, अनुभवले, पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
for your journalism wishing you a very best luck, and I wish your journalism do better work in future.
ReplyDelete