संपादक
कोरोना कोव्हिड-१९ या रोगाची दिवसेंदिवस वाढ होत आहे यामुळे जनता हैराण झाली आहे. कसे जीवन जगावे असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागत आहेत. त्यामध्ये सरकारचे लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी हे आदेश काय करावे जनतेने? जनतेला जगवण्यासाठी सरकारची जबाबदारी दिसून येत नाही. केवळ ताप, थंडी, सर्दी, गर्दी, तापमान कमी जास्त होणे, अंग दुखणे, दमा, शुगर, बीपी इ. लक्षणे प्रत्येक माणसामध्ये दिसून येत आहेत. परंतु ही लक्षणे आढळली म्हणून त्या व्यक्तिला कोरोना या रोगाचा रुग्ण म्हणून क्वारंटाईन केले जाते ही चिंताजनक बाब आहे. भारत सरकारने या देशात विविध योजना राबवत आहेत. त्या योजना बंद करून त्या योजनेला येणारा खर्च तो जनतेसाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मानसी १०००/- रु. प्रमाणे त्यांना देऊन जगवावे त्यामुळे निदान जनता सुखी होईल. माणस मरत असतील तर त्या योजना बघणार कोण? त्यामुळे भारत सरकारने जनतेचे हित पहावे. भारत सरकारने सर्व योजना बंद कराव्यात त्या निधिचा कोरोना या अपत्य काळात तो जनतेसाठी खर्च करावा. जनता त्या भयभीत झाली आहे. रोगापेक्षा उपासमारीने जनता मरण पावत चालली आहे याकडे लक्ष द्यावे. कोरोना कितीही वर्ष असू द्या त्याच प्रमाणे कितीही वर्ष लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी असू द्या जनतेसाठी आर्थिक पुरवठा करणे योग्य आहे. “कोरोना हा रोग येथेच आहे पण दिसत नाही” असा आहे की काय? तो मानव जातीलाच कसा काय होतो? जेवढे सजीव पशू-पक्षी, जनावरे, पाण्यातील अगर जमीनीवरील कोणताही प्राणी असू द्या त्यांनाही या कोरोना रोगाची लागण झाली पाहिजे होती परंतु तसे होताना दिसत नाही हे आश्चर्य म्हणावे लागेल. फक्त हा कोरोना रोग मानव जातीलाच टार्गेट कसा काय करतो आहे? हा रोग निसर्गनिर्मित नसून कोणीतरी बनवून मानवजात संपवण्यासाठी रचलेले एक षडयंत्र आहे असे माझे मत आहे. हा रोग निसर्गनिर्मित असता तर कोणत्याना कोणत्या तरी औषध उपचाराने बरा झाला असता पण तसे होताना दिसत नाही. हा रोग जेवढे सजीव आहेत तेवढ्या सर्वांना झाला पाहिजे होता. पण तसे झालेले दिसत नाही. केवळ मानव जातीलाच याचा फटका बसत आहे याचे कारण म्हणजे हा विषारी विषाणू निर्माण करून फक्त मानव जातीलाच संपवण्यासाठी तयार केलेला आहे असे दिसते. त्यामुळे कोरोना कोव्हिड-१९ याचे संकट जाईल, संपेल असे चित्र दिसत नाही हे मात्र सत्य वाटते. सर्व माझ्या बंधु बघिनींनी दक्षता बाळगा, स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी व भारत सरकारने आर्थिक पुरवठा जनतेसाठी करावा असे वाटते.
टीप : जे दिसले, अनुभवले, पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार