मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर |
संपादक
घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे नातू मा. श्री. अॅड. प्रकाशजी
तथा बाळासाहेब आंबेडकर म्हणजे या भारत देशातील जनतेसाठी सध्याचे “बापमाणूस”
आहेत. स्वाभिमानी नेता, दिनदुबळ्यांचे कैवारी, प्रत्येक भारतीयांच्या हृदयात स्थान असलेले एकमेव नेते म्हणजे प्रकाशजी म्हणजे
तथा बाळासाहेब आंबेडकर आहेत. रडण्यापेक्षा लढण्यात मजा असते. मागे लागून आमदार, खासदार होणे म्हणजे एक लाचारी असे साहेबांचे मत असते. साधी राहणी, उच्च विचार सरणी, कधी गर्व नाही असा सर्वांचा नेता आधार
म्हणजे बापमाणूस प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर. दिलेला शब्द पाळणारे “ना भय ना
भीती” बाळगणारे असे श्रेष्ठ साहेब आहेत. माझा प्रत्यके जातीपातीचा, धर्माचा बांधव आज वंचित राहिला आहे त्यांना न्याय मिळत नाही, त्यांचावर अन्याय अत्याचार होतात म्हणून एक धाडसी, विद्वान, झुंजार नेते म्हणून ओळख असलेले मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी
वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून वंचित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत
आहेत. साहेबांकडे वक्तशीरपणा, वेळेचे महत्व डोळ्यासमोर ठेऊन आंदोलने, कार्यक्रम स्थळी हजर राहतात. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवून अनेकांना धक्का दिला आहे. आता कोणत्याही दलित नेत्याकडे
कार्यकर्ते राहिले नाहीत. असंख्य कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या संख्येने
सामील होताना दिसतात. साहेब हे खर्या अर्थाने या भारतीय बांधवासाठी, भगिनीसाठी बापमाणूस झाले आहेत. जेवढे प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे
सर्व समाज मोठया आशेने बघतो तेवढे इतर कोणत्याही दलित नेत्याकडे बघत नाहीत ही सध्याची
परिस्थिति आहे. साहेब कधी थकलेले दिसत नाहीत, प्रवास, वेदना याचा भयंकर त्रास होत असेल पण साहेब कंटाळा आला म्हणून शांत झोपले आहेत
असे कधी होत नाही. यांच्या शरीरात जनतेचे हित व जनतेला न्याय हीच ध्येय उद्दिष्टे असलेचे
दिसते. राष्ट्रपती, खासदार, आमदार, मंत्री इ. पदे चालून आली तरी त्या पदाला कधी जवळ करणार नाहीत. जी पदे लढून, जिंकून जी पदे मिळतील ती पदे महत्वाची अशी त्यांची भूमिका असेल. स्वाभिमान
घाण ठेऊन खासदारकी, आमदारकी लाचारीने मिळविणे हे साहेबांच्या
रक्तात नाही. सध्या अनेक दलित नेत्यामध्ये स्वाभिमान आढळून येत नाही तर लाचारीचे नेते
म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे रंजल्या गांजल्यासाठी
दैवत ठरत आहेत. सामाजिक आंदोलने जनतेच्या हिताच्य दृष्ठीने करीत असताना कितीही गुन्हे
अंगावर झेलण्यासाठी हा सेनापती तयार असतो. गुन्ह्याला कधी घाबरणारा नाही. हा वंचित
बहुजन आघाडीचा नेता आंदोलनाच्या रणांगणात जात असताना लढून व विजय मिळवून येणारा सर्व
भारतीय बांधवांचा हेच “बापमाणूस” आहेत. जनतेला आपला रक्षणकर्ता आता वाटू लागले आहे.
या बापमाणसाची सरकारला भीती व चिंता वाटत आहे. सध्याच्या परिस्थितीत मा. प्रकाशजी तथा
बाळासाहेब आंबेडकर हे आदर्श ठरत आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या खमक्या नेत्याला मानाचा
जय भिम.
टीप
: जे दिसले, अनुभवले, पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Superb bro
ReplyDelete