Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे

 



वैभव आठवले 

संपादक

          साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे २९/०९/२०२० रोजी तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे. सर्व व्यवसायधारक, सामाजिक, राजकीय, शिक्षणक्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे, आशीर्वाद दिला आहे हे माझ्यासाठी बळ आहे. जे दिसेल तेच लिहणे हे माझ्या वृत्तपात्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. कोरोना या काळात अंक काढणे अवघड झाले असल्यामुळे अंक काढला गेला नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या विचाराची शिदोरी सोशल मीडिया मधून वाचकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. कोरोना या रोगाचा काळ चालू आहे. हा रोग संपुष्टात येऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...! आपण आपली सामाजिक कामे, पक्षाकडून निवड, गणेश मंडळाच्या वतीने केलेली कामे अशा सर्व स्थरातील कार्यकर्त्यांनी ना नफा ना तोटा” यावरती आधारित आपले काम माझ्या वृत्तपत्रातून देवून प्रसिद्धी करणार आहे. आपण आपले लेख, विचार, कविता, भ्रष्टाचार इ. विषयावर लेखन करून तसेच आपल्या व्यवसायाच्या जाहिराती देवून सहकार्य करावे. दिवाळी अंकात आपले सामाजिक काम आम्ही प्रसिद्धी करून अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी आमची भूमिका राहील. तुमचे सहकार्य हेच माझ्या वृत्तपत्रासाठी मौल्यवान देणगी व वरदान आहे. बहुजन भूषण या वृत्तपत्राचे तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे. यापुढेही संपदकाचे निर्भिड व सडेतोड विचार आपणास यापुढील काळात वाचावयास मिळतील. आपणा सर्वांना या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आठवले परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा...!

  टीप : जे दिसले, अनुभवले, पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

Comments

  1. for your journalism wishing you a very best luck, and I wish your journalism do better work in future.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...