संपादक
सन २०२०-२१ या कालावधीमध्ये लागलेल्या नातेपुते ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र. ३ मधील देशमुख पाटील युतीचे मा. अतुप (बापू) राजेंद्र पाटील (ग्रा. प.मा. उपसरपंच) यापूर्वी उपसरपंच म्हणून काम केले आहे व याही वेळेला वार्ड क्र. ३ मधून उमेदवार म्हणून निवडणूक देशमुख-पाटील युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत व इतरही या युतीचे उमेदवार रिंगणात आहेत. अतुल पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले की, गावातील ग्रामस्थांच्या व गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी निवडणूक लढवित आहे व माझ्या सोबत युतीचे उमेदवार आहेत. वार्ड क्र. ३ मधील ग्रामस्थांनी यावेळेला स्वच्छ व पारदर्शी कारभार करण्यासाठी आम्हाला मतदान करावे. यावेळेला वार्ड क्र. ३ मधील असंख्य ग्रामस्थ हजर होते व त्या सर्व ग्रामस्थांनी देशमुख पाटील युतीचे उमेदवार मा. अतुल(बापू) राजेंद्र पाटील व इतर उमेदवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या देशमुख-पाटील युतीचे काही उमेदवार बिनविरोध झाले आहेत व यापुढेही या युतीचे उमेदवार ग्रामस्थांच्या मताने निवडून येतील व ग्रामपंचायत मध्ये स्वच्छ व पारदर्शी गावाचा विकास व गावातील जनतेचे कामे करतील असे असल्यामुळे वार्ड क्र. ३ मधील ग्रामस्थांनी देशमुख-पाटील युतीला मतदान करण्याचा संकल्प केला आहे. वार्ड क्र. ३ मधील देशमुख-पाटील युतीचे उमेदवार अतुल(बापू) राजेंद्र पाटील यांनी पालखी मैदान माऊली मंदिर येथे ग्रामस्थांना बोलावून मीटिंग आयोजित केली होती त्यावेळी वार्ड क्र. ३ मधील ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा जाहीर केला आहे व वार्ड क्र.३ मधील सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार