![]() |
श्री बालयोगी महाराज |
संपादक
श्रीबालयोगी महाराज यांचा जन्म श्री पिता
नानासाहेब तातोबा भोसले व मातोश्री सौ. रतनबाई नानासाहेब भोसले यांचापोटी श्रीबाल योगी
महाराज यांचा जन्म झाला. जन्माला आल्यापासुन बाबांनी घरदार सोडून दर्या-खोर्या, डोंगर, जंगल येथेच राहायचे. बाबा हेच बाळ घेऊन आई वडील
समवेत भटकंती करीत चारोधाम यात्रा पूर्ण केली. बाबांना गगनगिरी महाराजावरती प्रचंड
श्रद्धा होती श्री. बालयोगी महाराज यांना शाळा माहिती नव्हती तरीपण शाळेत न जाता बाबांना
हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड अशा विविधी भाषा बोलता येत असत असे त्यांचे आई वडील व भाऊ व भक्त सांगत
आहेत. बाबा शाळेत गेले नाहीत पण त्यांनी केलेले लिखाण मी स्वत: संपादक या नात्याने
त्यांच्या वहीत लिहलेले पाहिले आहे. बाबांची भक्ति रंजल्या गांजल्यांना आनंदाचे, सुखाचे दिवस लाभावेत यासाठीच त्यांचा जन्म झाला असावा असे भक्त सांगतात. बाबांचे
निधन हे सर्वांसाठी हळहळ करणारे आहे. भक्तांना वाटते की, बाबांचे
निधन झाले नसून ते या पृथ्वीतलावर अजरामर आहेत, प्रत्येक हृदयात
आहेत. बाबांच्या सानिध्यात ज्या माताभगिनी लहान थोर आले त्यांनी बाबांच्या कार्याची
माहिती सांगताना अश्रु घाळीत होते, अंतकरण दाटून येत होते. बाबा
आमचे सर्वस्वी होते. बाबांमुळे आमच्या कुटुंबात आनंद नांदत आहे, बाबांमुळे आमची प्रगति झाली आहे. बाबा म्हणजे सर्वांसाठी आशीर्वाद आहेत. बाबांच्या
जाण्याने भक्त पोरके झाले असे भक्त सांगतात पण बाबांचे नामस्मरन करीत असताना बाबा आजूबाजूला
असल्याची जाणीव होते. बाबांचे अल्पशा आजाराने निधन झाले असले तरी बाबा हे जीवंत असून
भक्तांचे पालन पोषण करतात असे भक्त सांगतात. बाबांचे निधन सन २०१४ साली झाले. त्यांची
समाधी सांगोला तालुका गाव बागलवाडी जि. सोलापूर येथे असून त्यामुळे बागलवाडी गावाला
श्री. बाल योगी महाराजांच्या पुण्याईने ते समाधी स्थळ व गाव तीर्थक्षेत्राचे म्हणून
गौरवले जाईल. बाबांची समाधी होती पण मूर्ति नव्हते पण काही भाविकांचे म्हणणे होते की, बाबांची समाधी आहे तेथे बाबांची मूर्ति असावी. त्यामुळे भाविकांनी मूर्तीसाठी
सढळ हाताने मदत केली समाधीवर बाबांची मूर्ति बसवल्यामुळे ते मंदिर सुंदरमय झाले आहे.
समाधीला लागून महादेवाची पिंड आहे व मंदिरासमोर नंदी बसविला असल्यामुळे मंदिराची व
परिसराची अजून शोभा वाढली आहे. बाबांची पुजा जास्वंदीच्या फुलाने पहाटे ५.३० वा. आईच्या
हस्ते वडिलासमवेत होत असते बाबांच्या मूर्तिची स्थापना करीत असताना त्या रात्री भजन
कीर्तन केले गेले. या वेळी भक्तांनी सर्व येणार्या भाविकांना अन्नदान प्रसादाच्या
रूपाने केले. मी संपादक पत्रकार म्हणून मला सांगोला तालुक्यातील बागलवाडी गाव व श्री.
बालयोगी महाराज यांच्या मूर्तिची स्थापना हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आला. मला त्यांचा
इतिहास भक्तांनी सांगितला. त्यावेळी अवकाशातून वीज कडकडावी तशी बाबांची कहाणी समोर
आली हा एक अद्भुत चमत्कार म्हणावा लागेल. प्रत्येक माणसामध्ये देव असतो पण तो दिसत
नाही. त्यासाठी चांगले बोला, चांगले आचरण करा, निंदा कोणाची करू नका ही बाबाची शिकवण होती असे त्यांचे भक्त यांनी सांगितले.
बाबा हे संकट निवारण करणारे होते, काय संकट आले येणारे संकट काय
असणार हे बाबा सांगत होते एवढे त्यांना कळत होते. बाबा हे भक्तांचे श्रद्धास्थान बनले
आहे. दररोज आपली श्रद्धा ठेवून भाविक बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन व्हावे यासाठी
येत असतात. हा अंधश्रद्धेचा भाग नाही तर हा श्रद्धेचा भाग आहे. प्रत्येक व्यक्तिला
कोणती ना कोणती अधोगतीची कारणे असतात त्यांचे निवारण व्हावे कुटुंब प्रसन्न असावे वाद
विवाद नसावे या हेतूने श्रद्धा ठेवून भाविक श्री. बालयोगी महाराज यांच्या दर्शनासाठी
बागलवाडी येथे येत आहेत. बाबा हे सर्वांचे सर्व धर्म समभाव सर्वांसाठी आदर्श ठरत आहेत.
मला श्री. बालयोगी महाराज यांच्या विषयी जे दिसले, अनुभवले, जे मी पाहिले तेच लिहण्यास कारण ठरले. प्रत्येक भाविकांनी श्रद्धेपोटी श्री.
बालयोगी महाराज बागलवाडी ता. सांगोला, जि. सोलापूर एकतपुर पासून
८ किलोमीटर वरती समाधी आहे. आरण्या वनातून फिरत असताना असंख्य प्रकारचे पशू पक्षी सरपटणारे
प्राणी आडवे येत असत पण बाबांनी तेथेच त्यांना थांबा असे म्हंटले की ते तेथेच थांबत
व निघून जात. तसेच असंख्य भाविक बाबांना आर्थिक मदत करीत असत पण त्या देणगीला बाबा
स्पर्श करीत असत व ती देणगी परत घेऊन जाण्यास सांगत असत. पण कधी स्वार्थ दाखविला नाही.
असे श्री.बाल योगी महाराज होते. बाबांना कधी प्रसिद्धी माझी व्हावी असे कधी वाटत नव्हते
व मतही नव्हते. ही सर्व माहिती त्यांच्या आई वडील बहीण त्यांचे थोरले भाऊ विश्वास भोसले
यांनी बाबांच्या आठवणी जागृत केल्या. या स्थापनेवेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर या
सोहळ्याला उपस्थित होते.
टीप
: जे दिसले, अनुभवले, पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार