संपादक
पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा वाखरी गाव
हे पुणे पंढरपूर रोड वर असून त्या गावात पंढरपूर येथील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे
वाखरी गावातील काही घरामध्ये व दलित कुटुंबाच्या घरामध्ये पाणी शिरल्याने तेथील कुटुंबे
भयभीत झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ वाखरी येथील शाळा, पालखी मैदान येथे कुटुंबांना स्थलांतर केले आहे. तसेच सोलापूर विभागीय कार्यालय
पंढरपूर (वाखरी) बहुजन भूषणचे वृत्तपत्राच्या कार्यालयात पाणी शिरले आहे. भीमा नदीला
१३ वर्षानी अशी पुर परिस्थिती आल्यामुळे दैनिय अवस्था निर्माण झाली आहे. सर्व जनतेने
स्वत:ची कुटुंबाची काळजी घ्यावी. संकटामागुन संकटे येत आहेत. देशावर राज्यकर्त्यांचे
संकट, कोरोना व इतर रोगांचे संकट तसेच पावसामुळे आलेले महापुराचे
संकट, जनावरे व मानव जातीसाठी शाप ठरत आहेत. वाखरी ग्रामपंचायतचे
प्रशासक अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कर्मचारी, यांनी सतर्क रहावे. पुरामुळे झालेले शेतकर्याचे
पिकाचे पंचनामे, घरात पाणी शिरल्यामुळे झालेले नुकसान त्याचे
पंचनामे करून त्यांना त्वरित मदत देण्यासाठी सतर्क रहावे. तसेच पंढरपूर विभागाचे प्रांतअधिकारी
मा. सचिन ढोले साहेब येणार्या संकटावर लक्ष ठेवून आहेत त्यांची कामगिरी आदर्श ठरत
आहे.
टीप
: जे दिसले, अनुभवले, पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार