Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

किरकोळ भांडणाच्या रागातून दहिगाव येथील दोघांची चाकूने निर्घृण हत्या

उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीवरून      दिनांक १७/०५/२०२४ रोजी नातेपुते येथील बिअर बार परमिट  रूम येथे आरोपी नामे अक्षय बोडरे, राहणार फोंडशिरस व त्याचा दाजी दोघांनी नारायण विठ्ठल जाधव राहणार चिकणे वस्ती, दहिगाव, तालुका माळशिरस यास किरकोळ गोष्टीवरून शिवीगाळ करून मारहाण केल्याने त्याचा जाब विचारण्यास फिर्यादी व १)नारायण विठ्ठल जाधव २) दुर्योधन नवनाथ निकम ३)बाळू कुंडलिक जाधव ४)विनोद पोपट गोरे सर्व राहणार चिकणे वस्ती, दहिगाव तालुका माळशिरस असे सायंकाळी नातेपुते ते फोंडशिरस जाणाऱ्या रोडवरील बनात असलेल्या महादेव मंदिराजवळ गेले असता तेथे आरोपी नामे अक्षय बोडरे व त्याचा दाजी व इतर अनोळखी मुले यांना अक्षय बोडरे याने बोलावून घेऊन आम्ही सर्वांनी त्याला मारहाण केली आहे असे खोटे सांगितले नंतर त्या सर्वांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळी धमकी दमदाटी करून विटा मारून जखमी केले व अनोळखी मुलांपैकी एका मुलाने अक्षय बोडरे यास चाकू सारखे धारदार हत्यार दिल्यानंतर त्या हत्याराने अक्षय बोडरे यांनी 1) नारायण विठ्ठल जाधव यांना...

निवडणुकीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांची गैरसोय : हिवरकर पाटील

  उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      माळशिरस तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले वेळेत मिळत नसल्याने  विद्यार्थी व पालक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. इतर तालुक्यामध्ये त्वरीत दाखले मिळतात तर माळशिरस मध्येच दाखले मिळण्यास उशीर का? प्रत्येक वेळेस निवेदने, आंदोलने केल्यानंतरच दाखले मिळणार का? याबाबत माळशिरस तहसिलदार व प्रांत यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे व यावरती त्वरीत उपाययोजना करून हा सतत उद्भवणारा प्रश्न कायमचा मिटविला पाहिजे.      दोन महिन्यांपासून दाखले पेंडींग आहेत. निवडणूकीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. जशी निवडणूक महत्वाची आहे तसे विद्यार्थांचे शिक्षण देखील महत्वाचे आहे. एक काळ असा होता कि, आपणही कागदपत्रे काढण्यासाठी तहसिल व प्रांत ऑफिसला चक्रा मारल्या आहेत. याची जाणीव ठेवून काम करावे.      आता निवडणूक प्रक्रिया झाली तरीही विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाहीत. कित्येक विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. व 45 दिवसानंतरच दाखला मिळणार असे सांगितले जात आहे. असा कोणता शासनाचा...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यलय नातेपुते येथे नॅक कमिटीची भेट

उपसंपादक : वैभव आठवले      दिनांक १३-०५-२०२४ व १४-०५-२०२४ रोजी नॅक बेंगलोर यांचे तज्ञ महाविद्यालयाच्या चतुर्थ पूर्णमूल्यांकनासाठी महाविद्यालयात भेट देणार आहेत. या कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. संतोष कुमार – कुमाऊण विद्यापीठ नैनिताल (उत्तराखंड), मेंबर कोर्डीनेटर म्हणून प्रा.डॉ.सुबोध जैन – डॉ.हरिसिंग गौर सेन्ट्रल युनिवर्सिटी सागर, भोपाळ (मध्यप्रदेश) व मेंबर प्राचार्य. डॉ. धर्मेंद्र मिस्त्री-सी.सी-सेठ कॉलेज ऑफ कॉमर्स, अहमदाबाद (गुजरात). सदर तज्ञ महाविद्यालयाने केलेल्या गेल्या ५ वर्षातील गुणवत्तेच्या विकासाची तपासणी करून महाविद्यालयास श्रेणी देणार आहेत. यासाठी महाविद्यालयाच्या अध्यक्षा मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक तयारी करत आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.बी कोळेकर सर व  नॅक कोर्डीनेटर प्रा. उत्तम सावंत  सर यांनी दिली. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आ...

श्री.अभिजित भोसले यांचा माळशिरस तालुका प्रमुख, शिंदे गट मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांचेकडून कौतुकरूपी सत्कार

  उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र  अभिजित निर्मला भरत भोसले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी निवड झाली त्यानिमित्ताने शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार शिवरकर पाटील यांनी त्यांचा शिवसेना भावनावर सन्मान केला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिल्यावर कोणीही गुरगुरणारच हा बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थाने अभिजीत याने शिक्षणाच्या माध्यमातून सार्थक करून दाखवला आई-वडिलांचे छत्र हरपल तरीही खचून न जाता शिक्षणाप्रती स्वतःला वाहून घेतलं त्यामुळे यशाच्या शिखरापर्यंत त्याला पोहोचता आलं मिळालेले यश हे समाजातील उपेक्षित घटकांची सेवा करण्याकरता अर्पण केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांचा विचार चा जागर होणार तु  ज्या परिस्थितीतून अधिक शिकला त्याचा आदर्श एमपीसी यूपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अकलूज व गिरवी  येथे अभ्यास करून कोणतेही खाजगी शिकवणी न लावता सेल्फ स्टडी करून पास झाले. यामध्ये त्यांना २५१.५ गुण मिळवून त्यांना यश मिळाले आहे. ...

शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रे निमित्त चालत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य सेवा सुविधा देण्यासाठी माळशिरस तालुका अध्यक्ष मा.राजकुमार हिवरकर-पाटील तालुकाप्रमुख (शिवसेना शिंदे गट) यांचा आदर्श उपक्रम

      उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब कार्यसम्राट आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब DHO नवले साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी मोहिते साहेब विद्यमान तालुका वैद्यकीय अधिकारी शिंदे मॅडम शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यामध्ये शंभू महादेव कावड यात्रेनिमित्त ठिकठिकाणी फिरते दवाखाने निर्माण करण्यात आले आहेत त्याचा लाभ पायी चालत येणाऱ्या असंख्य शिवभक्तांना होत आहे.      राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक माळशिरस तालुका असल्याने शिखर शिंगणापूर येथे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश इंदोर गुजरात येथून शिवभक्त शिखर शिंगणापूरला येत असतात बहुतांश भाविक हे पायी चालत येत असतात ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलांसह कुटुंबांसह पाई प्रवास करीत असतात प्रवासात त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्...

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 77 अर्जदारांनी 122 अर्ज घेतले सोलापूरसाठी 58 तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 64 अर्ज घेण्यात आले सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण      भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर(अ. जा.) व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून 38 अर्जदारांनी 58 अर्ज घेऊन गेलेत तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 39 अर्जदारांनी 64 अर्ज घेऊन गेले गेलेले आहेत, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.   सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्‍तीचे नांव, फॉर्मची संख्या व पक्षाचे नांव पुढीलप्रमाणे – 01.श्रीविद्यादुर्गादेवी मौलप्पा करणे (2-अपक्ष) 02.भन्तेनागमूर्ती मौलप्पा करणे- (2 – अपक्ष)  03.श्री. शिवाजी चंद्रकांत सोनवणे- (2- अपक्ष) 04.श्री. व्यंकटेश्वरा महा स्वामीजी-(1- भाजपा) 05.श्री. संभाजी सिद्राम मस्के-(1-परिवर्तन समता पार्टी) 06. महासिध्द तुकाराम गायकवाड ( 1-अपक्ष) 07. श्री. भारत हणमंतु कंदकुरे( 2-अपक्ष) 08. श्री. अभिमन्यु भानुदास आठवले (1-अपक्ष ), 09. श्रीमती कल्याणी शंकर हलस...

स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेड रोवणाऱ्या, मिळवणाऱ्या फुले दांपत्याच्या विचारांचा विजय : राजकुमार हिवरकर-पाटील (शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख)

      उपसंपादक : वैभव आठवले, साप्ताहिक बहुजन भूषण      क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची आज १९७ वी जयंतीनिमित्त फोंडशिरस येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कक्ष अधिकारी परीक्षेमध्ये गावची सुकन्या भाग्यश्री संजय शेंडे हिने उत्तुंग असे यश संपादन केले त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.      फोंडशिरसमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी मनोगत व्यक्त करताना शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख श्री.राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले की, आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना खूप खूप कष्टाने आणि मेहनतीने शिकवले. त्यामुळे तमाम हिंदुस्थानातील स्त्री शिक्षण सुरू झाल आणि त्याचाच प्रत्यय म्हणून गावच्या सरपंच पदापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला दिसायला लागल्या आणि आज आपल्या गावची सुकन्या जनतेच्या सेवेसाठी सरकारच मुख्यालय असलेल्या मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी पदावर नेमणूक झाली हा खरा महात्मा ज्योतिराव फुले, सावित्री ...