उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
माळशिरस तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. इतर तालुक्यामध्ये त्वरीत दाखले मिळतात तर माळशिरस मध्येच दाखले मिळण्यास उशीर का? प्रत्येक वेळेस निवेदने, आंदोलने केल्यानंतरच दाखले मिळणार का? याबाबत माळशिरस तहसिलदार व प्रांत यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे व यावरती त्वरीत उपाययोजना करून हा सतत उद्भवणारा प्रश्न कायमचा मिटविला पाहिजे.
दोन महिन्यांपासून दाखले पेंडींग आहेत. निवडणूकीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. जशी निवडणूक महत्वाची आहे तसे विद्यार्थांचे शिक्षण देखील महत्वाचे आहे. एक काळ असा होता कि, आपणही कागदपत्रे काढण्यासाठी तहसिल व प्रांत ऑफिसला चक्रा मारल्या आहेत. याची जाणीव ठेवून काम करावे.
आता निवडणूक प्रक्रिया झाली तरीही विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाहीत. कित्येक विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. व 45 दिवसानंतरच दाखला मिळणार असे सांगितले जात आहे. असा कोणता शासनाचा जी आर आहे तो संबंधित तहसिल, प्रांत ऑफीस व महा ई सेवा केंद्रावरती लावण्यात यावा अशा मागणी करून विद्यार्थी व पालक तहसिलदार व प्रांत यांचेवरती तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
आता तरी हे पेंडींग दाखले त्वरीत विद्यार्थ्यांना मिळावेत कारण काही दिवसांत अॅडमिशन प्रक्रिया चालू होणार असून नंतर दाखल्यांचा लोड होणार आहे. अजून दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर यापेक्षाही प्रचंड गर्दी होणार असून, भविष्यात खूप मोठे संकट निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि जात पडताळणीसाठी 12 वी चा निकाल लागला तर 15A फॉर्म वरती कॉलेज सही करणार नाही. आणि 12 वी नंतर अनेक कोर्सला अॅडमिशनसाठी जात पडताळणी आवश्यक असते तर संबंधित अधिका-यांनी याबाबत लक्ष घालून शैक्षणिक दाखले त्वरीत वितरीत करावे, अशी मागणी सर्व सामान्य विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.
शिवसेना नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी लढा उभारत असते. कारण हेच विद्यार्थी भारताचे उद्याचे आधारस्तंभ आहेत. भारताचे उज्वल भविष्य याच विद्यार्थ्यांच्या हातात आहे. म्हणून त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेवून दाखले त्वरीत वितरीत नाही केले तर माळशिरस शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी म्हटले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.