उपसंपादक : वैभव आठवले
दिनांक १३-०५-२०२४ व १४-०५-२०२४ रोजी नॅक बेंगलोर यांचे तज्ञ महाविद्यालयाच्या चतुर्थ पूर्णमूल्यांकनासाठी महाविद्यालयात भेट देणार आहेत. या कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. संतोष कुमार – कुमाऊण विद्यापीठ नैनिताल (उत्तराखंड), मेंबर कोर्डीनेटर म्हणून प्रा.डॉ.सुबोध जैन – डॉ.हरिसिंग गौर सेन्ट्रल युनिवर्सिटी सागर, भोपाळ (मध्यप्रदेश) व मेंबर प्राचार्य. डॉ. धर्मेंद्र मिस्त्री-सी.सी-सेठ कॉलेज ऑफ कॉमर्स, अहमदाबाद (गुजरात).
सदर तज्ञ महाविद्यालयाने केलेल्या गेल्या ५ वर्षातील गुणवत्तेच्या विकासाची तपासणी करून महाविद्यालयास श्रेणी देणार आहेत. यासाठी महाविद्यालयाच्या अध्यक्षा मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक तयारी करत आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.बी कोळेकर सर व नॅक कोर्डीनेटर प्रा. उत्तम सावंत सर यांनी दिली.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.