उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीवरून
दिनांक १७/०५/२०२४ रोजी नातेपुते येथील बिअर बार परमिट रूम येथे आरोपी नामे अक्षय बोडरे, राहणार फोंडशिरस व त्याचा दाजी दोघांनी नारायण विठ्ठल जाधव राहणार चिकणे वस्ती, दहिगाव, तालुका माळशिरस यास किरकोळ गोष्टीवरून शिवीगाळ करून मारहाण केल्याने त्याचा जाब विचारण्यास फिर्यादी व १)नारायण विठ्ठल जाधव २) दुर्योधन नवनाथ निकम ३)बाळू कुंडलिक जाधव ४)विनोद पोपट गोरे सर्व राहणार चिकणे वस्ती, दहिगाव तालुका माळशिरस असे सायंकाळी नातेपुते ते फोंडशिरस जाणाऱ्या रोडवरील बनात असलेल्या महादेव मंदिराजवळ गेले असता तेथे आरोपी नामे अक्षय बोडरे व त्याचा दाजी व इतर अनोळखी मुले यांना अक्षय बोडरे याने बोलावून घेऊन आम्ही सर्वांनी त्याला मारहाण केली आहे असे खोटे सांगितले नंतर त्या सर्वांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळी धमकी दमदाटी करून विटा मारून जखमी केले व अनोळखी मुलांपैकी एका मुलाने अक्षय बोडरे यास चाकू सारखे धारदार हत्यार दिल्यानंतर त्या हत्याराने अक्षय बोडरे यांनी 1) नारायण विठ्ठल जाधव यांना 2) दुर्योधन नवनाथ निकम पोटात हत्यार खूपसून काढून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आहे...
घटना व तक्रारीवरून नातेपुते पोलीस ठाणे येथे भादवि कलम 302,323,324,504,506,143,147,148,149 सह बीपी ॲक्ट 1350अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत..
घटनेस वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ भेटी दिलेल्या असून फरार आरोपी शोधकामी एकूण 3 पोलीस पथके तयार करण्यात आलेले असून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करीत आहेत..
किरकोळ भांडणाच्या रागातून दहिगाव येथील दोघांची चाकूने निर्घृण हत्या
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
https://bahujanbhushan.blogspot.com/2024/05/blog-post_20.html