Skip to main content

Posts

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातून प्रत्येक गावात "संविधान भवन" बांधण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत तरी बौद्ध समाजातील बांधवांनी यासाठी झटावे

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र   गावातील प्रत्येक व्यक्तीने ग्रामपंचायतमध्ये याबाबत चौकशी करावी. संविधान भवन कोठे बांधायचे? व ते कशा पद्धतीने बांधायचे आहे? याबाबत ग्रामपंचायतमध्ये ठराव देवून पंचायत समितिकडे नेऊन द्यायचा आहे. प्रत्येक गावात संविधान भवन हे सामाजिक न्याय विभागाकडून बांधण्यात येणार आहे. समाजबांधवांना कोणताही एक रुपया खर्च करण्याची गरज नाही, सर्व प्रक्रिया शासनाची आहे ती ग्रामपंचायतकडून घेण्यात येणार आहे.  संविधान भवन प्रत्येक गावात बांधणे बंधनकारक आहे. याला कोणाचा विरोध असला तरी ते काहीच करू शकत नाहीत. ही प्रक्रिया ग्रामपंचायतमार्फत, पंचायत समिति मार्फत, जिल्हा परिषद मार्फत नंतर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाकडे जाणार आहे. यामध्ये कोणाची मध्यस्थी राहणार नाही, कोणीही दलाली करू शकनार नाही.  त्यासाठी महत्वपूर्ण अटी पुढीलप्रमाणे.      १) ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव घेणे. २) मासिक सभा ठराव विषय - सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायतमध्ये संविधान भवन बांधून मिळणेबाबत असा विषय राहील.  ३) तसेच संविधान भवन...

राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांनी ०५/०३/२०२१ रोजी घेतलेल्या माहिती अधिकाराची सुनावणी त्यामुळे अर्जदार जोमात तर अधिकारी कोमात हे पहायला मिळाले

संपादक   साप्ताहिक बहुजन भूषण  दिनांक ०५/०३/२०२१ शुक्रवार रोजी दुपारी ३.०० वाजलेपासून ज्या अर्जदारांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांच्याकडे सन २०१७ मध्ये अपील दाखल केले होते त्या अपिलाची सुनावणी आज दिनांक ०५/०३/२०२१ रोजी पार पडली. त्या सुनावणीत जनराज्य माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांनी माहिती मागितलेल्या अर्जदारांना माहिती न दिल्यामुळे व अपील अधिकाऱ्यांनी अपील आदेश न काढल्यामुळे राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे सन २०१७ रोजी अपील केले होते त्या अपिलाची सुनावणी आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली. हा एक चांगला योग आला.  आयोगाच्या समोरासमोर जनराज्य माहिती अधिकारी, अपील अधिकारी, अर्जदार व राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ पुणे आयुक्त यांनी सुनावणी घेतली. त्यामुळे अर्जदारांच्या अर्जाला वाचा फुटली आहे, अर्जदारांना आनंद वाटला आहे. माहिती देताना राज्य माहिती अधिकारी यांनी टाळाटाळ करू नये, दप्तर दिरंगाई करू नये, असे चालणार नाही व अपील अधिकारी यांनाही अपील घेताना टाळाटाळ व दप्तर दिरंगाई करता येणार नाही या आजच्या सुनावणीने दाखवून दिले.  त्याचप्रमाणे आज अर्जदारांनी व्यक्तिशा मागित...

आयडीबीआय बँक नातेपुते शाखा मॅनेजर यांचे विरोधात गणेश मल्हारी घुले यांचे उपोषण

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील गणेश मल्हारी घुले यांनी 26/01/2023 पासून आयडीबीआय बँक शाखा नातेपुते मॅनेजर विरोधात उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. उपोषण सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहेत असे म्हणाले. तसेच बँक मॅनेजर यांनी 10 ते 11 महीने कर्ज प्रकरण मंजूर करण्यास वेळ लावला, माझी दिशाभूल केलेली आहे. मी खादी ग्रामोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडे 25 लाख रुपये व्यवसाय कर्जासाठी अर्ज दिला होता. त्यासाठी ट्रेनिंग हे केले व प्रकरण मंजूर ही झाले, ते प्रकरण नातेपुते आयडीबीआय बँक शाखा नातेपुते यांच्याकडे पाठविले. माझ्या प्रकरणाची दखल घेतली नाही, दिशाभूल केली, दफ्तर दिरंगाई कायद्याचा अवमान केला गेला यामुळे मानसिक त्रास झाला आहे. वेळ व जाण्यायेण्यासाठी पैसाही खर्च झाला आहे. कर्ज प्रकरण त्वरित मंजूर व्हावे यासाठी 11/11/2021 रोजी मुंबई मंत्रालय येथे समक्ष जावून मुख्यमंत्री कार्यालयात माझी व्यथा वेदना मांडली व प्रकरण मंजूर करण्यात यावे असे मी दिलेल्या अर्जावर नमूद केले व मुख्यमंत्री कार्यालयातून मेसेज ही आला परंतु दखल घेतली नाही. बँकेत...

भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता

उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण           भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केवळ घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते म्हणून पाहिले जाते पण ते एक संपादक पत्रकार होते. बाबासाहेबांनी 24 नोव्हेंबर 1930 साली जनता नावाचे वृत्तपत्र सुरू केले, ते पाक्षिक होते नंतर ते साप्ताहिक केले. तसेच वृत्तपत्र हे आधुनिक युगाचे, प्रगतीचे, लोकशिक्षणाचे चांगले माध्यम असल्याने त्याद्वारे अश्पृशांच्या हक्काची मागणी मांडता येईल यादृष्टीने बाबांनी 31 जानेवारी 1920 रोजी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केले त्यास 103 वर्षे पूर्ण होत आहेत.       तसेच अश्पृशांची चळवळ भक्कम करण्यासाठी आपले वृत्तपत्र असल्याशिवाय पर्याय नाही असे बाबांना वाटू लागले. त्यामुळे 03 एप्रिल 1927 रोजी "बहिष्कृत भारत" हे वृत्तपत्र सुरू केले. 31 जानेवारी 2023 रोजी मुकनायक वृत्तपत्राच्या वर्धापनदिनाला कोटी कोटी शुभेच्छा...!  या वर्धापन दीनानिमित्त शासकीय, निमशासकीय, समाजाने या मुकनायक वृत्तपत्राच्या 103 व्या दिनानिमित्त आपआपल्यापरीने कार्यक्रम घेवून वर्धापनदिन साजरा करावा.  जनहिता...

ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगला,सभांना ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचा अधिकार- मा.श्री.डॉ.अभिमन्यु. बी. आठवले

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगला सर्व सामान्य ग्रामस्थांना बसता यावे यासाठी अनेक युवकांनी आपआपल्या परीने ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ग्रामविकास विभागाच्या अधिकारी यांनी आता ग्रामस्थांना मासिक मीटिंगला, सभांना बसण्याचा अधिकार आहे असे कळविले आहे. ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आता कोणीही अडथळा करू शकणार नाहीत. याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात आले आहे त्यामुळे हा आदेश राज्यातील सर्व ग्रामपंचायतना लागू झाला आहे. या मासिक मीटिंगला, सभेला यापुढे ग्रामस्थांना हजर राहण्याचा अधिकार आहे. सहभागातून यापुढे ग्रामपंचायतचा कारभार अधिक पारदर्शी व्हावा म्हणून यापूर्वीही राज्य शासनाने 19 सप्टेंबर 1978 रोजी शासकीय परिपत्रक काढले होते. परंतु या मासिक मीटिंगला, सभांना ग्रामस्थ यांनी हजर राहू नये या दृष्टीने ग्रामपंचायतने एकमताने ठराव करून सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक या व्यक्तिरिक्त इतर ग्रामस्थांना त्यामध्ये सहभाग घेवू नये यासाठी ग्रामपंचायतने ठराव केले होते. ग्र...

आमदारांना "आमसभा" घेण्यास "अॅलर्जी" जनतेमध्ये तीव्र नाराजी

उपसंपादक  बहुजन भूषण सध्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार जनतेच्या मतामुळे निवडून गेले त्यांना आपल्या तालुक्याचा व तालुक्यातील जनतेचा विसर पडला आहे असे दिसते. मतदारांना वार्‍यावरती सोडले आहे , आमदारांनी आपल्या मतदार संघात आमसभा घेवून जनतेच्या असलेल्या अडीअडचणी याबाबत अर्ज , निवेदन घेवून चर्चा करून सोडविण्यासाठी आमदारांनी आमसभा घेतली पाहिजे. ज्या तालुक्यातून आमदार झाले त्या तालुक्यात आमदार आमसभा घेताना दिसत नाहीत ही चिंताजनक व खेदजनक गंभीर बाब आहे. आमदारांनी आमसभा घेणे बंधनकारक आहे. तसेच काही आमदार स्टंट करण्यात पटाईत आहेत. मत मागताना निवडणुकीच्या दरम्यान आमदार होण्यासाठी प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जात होते. परंतु निवडून आलेवर कोण मतदार , कोणता तालुका ? याचा विसर पडला. आमदारांना आमसभा घेण्यास अॅलर्जी आली आहे असे कदाचित दिसते. आमसभा घेणेही जनतेसाठी हिताचे असते.  आमदारांनी आमसभा घेतल्याचे शासकीय दरबारी कागदोपत्री दाखविले जाते की काय ? असे वाटते. आमसभा न घेणार्‍या आमदाराविषयी जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे व त्या आमदारावर जनता उदासीन आहे. केवळ आमदार निधीतून योजनेची ना वे सांगू...

ही शाळा माझी आहे, या शाळेला जेवढी मदत करता येईल तेवढी करीन, ही शाळा मी दत्तक घेतली राम सातपुते (आमदार, माळशिरस विधानसभा)

समता इंग्लिश मेडियम स्कूल नातेपुते या स्नेहसंमेलना निमित्त आपले विचार व्यक्त करताना माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते  उपसंपादक - बहुजन भूषण वृत्तपत्र सालाबादप्रमाणे समता इंग्लिश मेडियम स्कूल नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन २३/०१/२०२३ ते २६/०१/२०२३ रोजी पार पडले. यावेळी या शाळेतील विद्यार्थी यांनी चालू घडामोडीवर उपक्रमाची निर्मिती केलेली प्रात्यक्षिक करून दाखविले. या शाळेची स्थापना करून १५ वर्षे होत आहेत. या शाळेतील विद्यार्थी यांनी स्पर्धेमध्ये तसेच इतर खेळामध्ये यश मिळवून शाळेचे नाव लौकिक केलेले आहे. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे माळशिरस विधानसभेचे आमदार श्री.राम सातपुते व सौ.संस्कृती राम सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले की , ही शाळा माझी आहे . या शाळेला जेवढी मदत लागेल तेवढी करीन , ही शाळा मी दत्तक घेतली असे आश्वासन दिले.  तसेच या शाळेला महिन्यात १० कॉम्पुटर देणार असल्याचे सांगितले. तसेच नातेपुते गावाला विकासासाठी १० कोटी रुपयेचा निधि उपलब्ध करून दिलेला आहे. यावेळी सौ.संस्कृती राम सातपुते यांनी आपले...