मा.श्री.मामासाहेब पांढरे कृषि उत्पन्न बाजार समिति, उपसभापती |
संपादक
नातेपुते येथील अत्यंत प्रत्यकुल परिस्थितीशी
“झुंज” देत अडचण समजून नातेपुते येथील एका दुकानात कामगार म्हणून काम करीत होते.
घरची वडीलोपार्जित तूटपुंजी शेती एखादे दुसरे दुबते जनावर या पासून निघणारे एक ते दोन
लीटर दूध एखाद्या कुटुंबाला रतीबाने सायकल वरुन येवून पोहोचवत असत. कोणताही राजकीय
वारसा नव्हता. मामांना मी अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहे. मनमिळावू स्वभाव, कधी गर्व नाही, थोरमोठ्यांचा आशीर्वाद घेवून विश्वासाला
कुठेही तडा न लागता कर्तव्यात कसूर न करता सर्वांना आदर भाव देवून आपले माणुसकीचे कर्तव्य
जपत आहेत. मामासाहेब पांढरे लहान थोरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. सामाजिक बांधिलकी
म्हणून आपले कर्तव्य बजावतात. मामासाहेबांची राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना
येथून सुरुवात झाली त्यामुळे “मनसेने तारले, राष्ट्रवादीने
हेरले आणि भाजपने स्वीकारले” असा मामासाहेबांचा राजकीय प्रवास
सुरू झाला त्यानंतर एक एक पाऊल पुढे पडू लागले. नातेपुते ग्रामपंचायतचे सदस्य झाले
बघता बघता कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक ते उपसभापती झाले असा प्रवास सुरू झाला.
मामासाहेब नातेपुते येथील असलेल्या अक्षय शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. थोरामोठ्यांच्या
आशीर्वादाने मामासाहेब यांची गतिमान पावले हळू हळू प्रगतिच्या दिशेने पडत आहेत. मामासाहेबांच्या
दिलदारपणामुळे माणुसकीचे दर्शन हेच त्यांच्या आयुष्यातील वाढता आलेख, नकाशा बनत आहेत. मामासाहेबांना जवळून बघितल्यामुळे त्यांच्याविषयी मला माहिती
आहे. नुकतीच नातेपुते ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले आहे त्यामुळे येणार्या
काळात मामासाहेब पांढरे यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात
सध्या नावारूपाला आलेले एक नेतृत्व आहे. युवकांचा मोठा जनसागर अवती भोवती व मानणारा
आहे. येणार्या काळात मामासाहेबांची विधान परिषदेपर्यंत प्रवास हा अशाच प्रगतिच्या
दिशेने पुढे पुढे जात राहील. मामासाहेब आज तुमचा वाढदिवस साजरा होत आहे अशीच तुम्ही
यशाची कमान उभारून प्रगतिच्या दिशीने मार्गक्रम कराल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हास वाढदिवसानिमित्त
आठवले परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा...!
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.