संपादक
नातेपुते येथे SND इंटरनॅशनल
स्कूल येथे दि.१०/०८/२०२१ रोजी मा.आबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक होऊन मा.श्री.शहाजीराव
मुधोजीराव तथा बाबाराजे (दादा) देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर यांचा १४
ऑगस्ट रोजी ६१ वा वाढदिवस असून त्या निमित्ताने गरजू व गरीब अशा व्यक्तींना लस मिळाली
नाही अशा ५०० व्यक्तींना लस देवून हा सामाजिक उपक्रम पार पडणार आहे. एका डोस ची किंमत रु ७०० रु असून लसीचा पहिला डोस
वाढदिवसानिमित्त देण्यात येणार आहे हा सामाजिक उपक्रम दाते प्रशाला,
नातेपुते येथे १० ते ०३ या वेळेत होणार आहे. लसीकरणासाठी वयोमार्यादा १८ वर्षे ते ६०
वर्षे अशी राहणार आहे. लस देताना पुरुष व महिला यांना स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था
केलेली आहे. लसीकरणासाठी नाव देण्यासाठी मोबाइल नं. ७९७२००९०९० प्रवीण राऊत व ९३०७६८१०९६
संदीप ननवरे यांच्याकडे नाव नोंदणीसाठी संपर्क करावा असे आबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
१३ तारखेपासून संचारबंदी लागू होणार असल्यामुळे इतर कोणतेही उपक्रम गर्दीमुळे होणार
नाहीत. नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मा.आबासाहेब देशमुख
युवकांना मार्गदर्शन करताना असे म्हणाले की, आपण सर्वांनी कोणताही सामाजिक उपक्रम राबवित
असताना असेच एकत्र येवू, एकसंघ राहू,
गावाच्या विकासासाठी जोर लावू, हातात
हात घालून विकासासाठी झटू असे आबासाहेब देशमुख यावेळी मार्गदर्शनपर आपली भूमिका
व्यक्त केली. या बैठकीस नातेपुते येथील युवक मोठ्या प्रमाणात हजर होते.
लस
घेण्यापूर्वी प्रत्येकाची चाचणी करण्यात येणार आहे.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे
ध्येय उद्दीष्ट आहे.