संपादक
नातेपुते ता.माळशिरस येथील ग्रामपंचायतचे
रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले. यासाठी नातेपुते येथील नगरपंचायत होण्यासाठी ठराव करण्यासाठी
यापूर्वी प्रथम आवाज उद्योगपती मा.सुधीरजी काळे साहेब यांनी गेल्या ५ वर्षामध्ये उठविला
होता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात आवाज उठवला ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह (दादा)
मोहिते-पाटील व त्यांचा परिवार अकलूज, माळेवाडी, नातेपुते येथील नेते मंडळी यांनी उपविभागीय(प्रांत)
कार्यालय अकलुज येथे ४३ दिवसाचे साखळी उपोषण सुरू होते अकलुज माळेवाडी नगर परिषद अ
व नातेपुते नगरपंचायत स्थापन करण्यास कारण ठरले त्यामुळे अधिसूचना राज्य सरकारचे सचिव
मा.सतीश मोघे साहेब यांनी राज्यापालाच्या सहीणीशी काढले. अकलुज,
माळेवाडी नगरपरिषद अ व नातेपुते नातेपुते नगरपंचायत होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील
नेते मंडळी व सामाजिक संघटनेचे नेते मंडळी व कार्यकर्ते यांनी आवाज उठविला त्यामुळे
आजच्या दिवसाचे स्वप्न साकार झाले. हा दिवस स्थापना दिन म्हणून यापुढे राहील. अकलुज
माळेवाडी नगरपरिषद अ व नातेपुते नगरपंचायत जाहीर झाल्याचे आदेश निघाल्याची बातमी वार्यासारखी
पसरली व अकलुज माळेवाडी अ नातेपुते येथे फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून ग्रामस्थांनी
आनंद व्यक्त केला. नातेपुते येथील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. बाबाराजे(दादा)
देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापति मामासाहेब पांढरे,
नातेपुते ग्रामपंचायतचे उपसरपंच अतुल (बापू) पाटील इ.चा समावेश नगरपंचायत करण्यासाठी
सार्थ ठरले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अकलुज, माळेवाडी नगरपरिषद अ व नातेपुते नगरपंचायत
जाहीर झाल्यामुळे अनेकजण नगरसेवक होण्यासाठी मनामध्ये इच्छा बाळगून आहेत. अकलुज,
माळेवाडी अ नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत झाल्यामुळे यापुढे प्रचंड प्रमाणात विकासासाठी
निधि उपलब्ध होणार आहे त्यामुळे विकासाची गंगा वाहणार आहे. त्यामध्ये त्याचप्रमाणे
आरक्षण कोणत्या समाजाला सुटणार प्रथम नगराध्यक्ष पुरुष की महिला होणार यापुढे लक्ष
लागून राहिले आहे. भरमसाठ निधि उपलब्ध होणार असल्यामुळे त्या गावचा सर्वांगीण विकास
होणार आहे. यासाठी खासदार, आमदार माजी उपमुख्यमंत्री,
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, उद्योगपती, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक, राजकीय पक्षाचे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते,
सर्व बांधव यांनी पुढाकार घेवून सरकारला अकलुज, माळेवाडी नगरपरिषद अ व नातेपुते नगरपंचायत
करण्यासाठी एकनिष्ठेने एकीचे बळ सर्वांनी हातात हात घालून यासाठी आवाज उठविला त्यामुळेच
अकलुज माळेवाडी नगरपरिषद अ व नातेपुते नगरपंचायत स्थापन करण्यात आली. अकलुज,
माळेवडी नगरपरिषद अ वरती प्रशासक म्हणून माळशिरसचे तहसिलदार यांची नियुक्ती तर नातेपुते
नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून पंढरपूर मुख्याधिकारी नगरपरिषद यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. या ग्रामपंचायत वरती जे विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य त्यांचा फक्त सहा महीने कालावधी आहे.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
योग्य बातमी
ReplyDelete