संपादक
सध्या महाराष्ट्रात राजकारण हे घराणेशाही
परंपरेने चालत आहे त्यामुळे शिकले, सवरलेले युवक शासनकर्ते,
राज्यकर्ते बनण्यापासून वंचित राहत आहेत. परंपरेने आपल्याच घराणेशाहीची वाटचाल असली
पाहिजे मग ती ग्रामपंचायत असो, नगरपंचायत असो,
नगारपरिषद असो, नगरपालिका असो, अथवा आमदार,
खासदार, विधान परिषद आमदार, पंचायत समिति,
जिल्हा परिषद इ. वर घराणेशाहीचे वर्चस्व असावे असा हेतु असतो. घराणेशाहीने पदे भोगत
राहायची आणि कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्या उचलत राहायचे हेच पहायला मिळत आहे.
“घराणेशाही ही ढेकुणाचे वंशावळ” आहे. स्वत: चा स्वार्थ साधण्यासाठी दुसर्याचे
शोषण करीत राहायचे. युवकांचा उपयोग फक्त मतदानासाठी करून घ्यायचा,
मत आपणच टाकायची आणि गुलाल, हारतुरे घालून सत्कार आपणच करायचा हेच चाललेले
आहे. घराणेशाहीला निष्ठावान कार्यकर्ते असताना सुद्धा त्यांचा विचार हा युवक शासनकर्ता,
राज्यकर्ता बनला पाहिजे ही मानसिकता दिसून येत नाही. मतदारांनी सुद्धा यापुढे घराणेशाहीची
चालत आलेली परंपरा मोडीत काढून अभ्यासू विचारवंत, यांनी एकत्रित येवून शासनकर्ते,
राज्यकर्ते होण्यासाठी राजकरणात प्रवेश केला पाहिजे. युवकांनी एकत्र येवून घराणेशाहीची
चालत आलेली परंपरा संपुष्टात आणली पाहिजे. घराणेशाही म्हणजे एक प्रकारची “वाळवी”
आहे. आपण शाबूत राहून इतरांना “खिळखिळी” करते. सध्या युवकांचे ग्रुप सामाजिक कामे करण्यासाठी
पुढे येत आहेत. प्रत्येकाच्या सुखा: दु:खात सहभागी होत आहेत असे आदर्श कामे करीत आहेत.
त्यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे. त्यामुळे युवकांनी स्वत: ला कमी लेखू नये. पक्षाची
उमेदवारी मिळेल ही भोळी अपेक्षा ठेवू नका. अपक्ष म्हणून राजकारणाच्या रिंगणात आत्मविश्वासाने
उतारा. स्वत:च्या फायद्यासाठी घराणेशाही तुमचा फक्त वापर आणि फेकून द्या असे करीत आहे.
तुमच्याबद्दल मासिकता व नियत वाईट असते. घराणेशाही शोषण करणारी आहे,
पोषण करणारी नाही. “आयत्या बिळात नागोबा” ही त्यांची प्रवृत्ती असते. सत्ता हीच त्यांची
शिदोरी असते. सत्यविणा जगने घराणेशाहीला अवघड होते. घराणेशाहीचा उदो-उदो करणारी लाचारी
मंडळी ही दिसत आहेत ही परिस्थिति सगळीकडे आहे. युवकांनी पुढे येवून शासनकर्ते,
राज्यकर्ते बनावे ही काळाची गरज आहे. युवकांनी घराणेशाही पुढे लाचारी पतकरू नये स्वाभिमानाने
रहावे. घराणेशाही सन्मानाने तुम्हाला शासनकर्ते, राज्यकर्ते बनवीत असतील तर जरूर त्यांचा आश्रय
घ्या.
युवकांनो तुमचा वाढदिवस असेल तर हे घराणेशाहीचे
नेते मंडळी साधा शुभेच्छा देण्यासाठी फोन तरी करतात का?
त्यांना तुम्हाला शुभेच्छा देणे अवघड जागेचे दुखणे वाटते,
कमीपणा त्यांना वाटतो हे मी संपादक म्हणून अनुभवले आहे. घराणेशाहीच्या नौटंकीला युवकांनो
बळी पडू नका. घराणेशाही कशी संपुष्टात येईल याचा विचार करा. तुमच्या आनंदात,
दु:खात जे सहभाही होतात तेच आपले खरे नेते असतात. घराणेशाहीला जाती-जातीचे वावडे असते,
त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असते, त्यांना तुम्हाला राज्यकर्ते बनण्यापासून
अलिप्त ठेवणे हेच त्यांचे कट कारस्थान चालू असते इतकेच.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.