संपादक
गेल्या दोन वर्षापासून कोरोना कोव्हिड-१९
या रोगाने हाहाकार माजवला आहे त्यामुळे शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, छोटे भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते इ. असंख्य व्यवसायावर संकट आलेले आहे. शासनाचे आदेश जनतेच्या
मुळावर उठले आहेत. जनतेला जगणे अवघड झाले आहे. देशातील जनता मरण यातना भोगत आहे. पोटभर
अन्न मिळेना, बाहेर पडता येईना. नाव रोगाचे, आदेश शासनाचे जनतेवर कारवाई करण्यासाठी पोलिस बांधवाची जबाबदारी त्यामुळे
पोलिस बांधवांना जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागते. पोलिस बांधव हे कोणाचेही दुश्मन
नसतात शासनाच्या आदेशाला सामोरे जाऊन आपल्याच बांधवावरती कारवाई मनात नसताना करावी
लागते हे पोलिस बांधवांना सुद्धा वेदना देणारे वाटते. पोलिस बांधवांचा ना इलाज असतो
परंतु त्यातल्या त्यात पोलिस बांधवांनी न कळत जनतेचा विचार केला तर त्याचे त्यांना
सुद्धा समाधान मिळेल. कर्तव्य जपा पण माणुसकीही जपा असे पोलिस बांधवाचे असले पाहिजे.
या दोन वर्षात कोरोना कोव्हिड-१९ या रोगामुळे जनता पुर्णपणे होरपळून निघाली आहे. या
काळात राज्यकर्ते जोमात आणि जनता कोमात गेलेली पाहत आहे. या रोगाच्या आपत्ती काळात
कोणताही गुन्हा जनतेने केला नसताना ते गुन्हेगार आरोपी ठरले आहेत. स्वत:चे व कुटुंबाचे
इतभर पोट भरण्यासाठी कोणता न कोणता तरी छोटा मोठा व्यवसाय करीत असताना त्यावरती सुद्धा
पोलिस बांधवाची करडी नजर बघायला मिळत आहे. ज्या जनतेने मत देवून राज्यकर्ते बनवले तेच
राज्यकर्ते जनतेचे शोषणकर्ते झाले आहेत अशी दैनिय अवस्था पाहत आहे. कोरोना या आपत्तीच्या
काळात केंद्रातील तसेच विविध राज्यातील मंत्री मंडळातील राज्यकर्त्यांना कोरोना होवून
मंत्री मंडळाची संख्या कमी झालेली दिसली नाही. हा रोग राज्यकर्त्यासाठी वरदान ठरला
की काय? आणि जनतेसाठी शाप आहे असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
पोलिस बांधवांनो तुम्हीच मायेच्या पदराखाली या जनतेला सावली देवून छोटे मोठे व्यवसाय
करण्यास जनतेला सहकार्य करा. जनतेला राज्यकर्त्याचा नव्हे तर पोलिस बांधवाचा आधार पाहिजे.
तुम्हीच जनतेचे रक्षणकर्ते आहात त्यामुळे त्यांचे शोषण करू नका. कोरोना कोव्हिड-१९
या रोगाच्या आपत्तीच्या काळात निरपराध व्यक्ति तुमच्याकडून अपराधी बनली आहेत. “ज्याची
खावी पोळी त्याची वाजवावी टाळी” हे बरोबर आहे. नोकरीसाठी दिलेली जबाबदारी पार पाडावीच
लागते. पोलिस बांधवांनो तुमच्यावर ताण आहे त्याची जनतेला जाण आहे आणि पोलिस बांधवांची
नोकरी ही वेदनेच्या दारी आहे हेही पाहत आहे परंतु थोडे जनतेसाठी तुम्हीच मायबाप व्हा, नका जनतेला वेदना देवू, मिळालेले जीवन तुम्हीही वेदनामुक्त
जगा आणि जनतेलाही जगू द्या. जनतेचा पाठीराखा व्हा, आधार व्हा, जनतेवर कारवाई करून समाधान मिळणार नाही. रोग येईल जाईल परंतु बांधवांनो या
आपत्तीच्या काळात जनतेवर केलेली कारवाई, दाखल झालेले गुन्हे आयुष्यात
गुन्हेगार म्हणूनच राहणार. जनतेसाठी शासनाचे आदेश जुगारून थोडेफार जनतेचे हाल होऊ नये
यासाठी सहकार्य करा ही अपेक्षा जनतेची आहे. कोरोना या रोगाच्या आपत्ति काळात सर्वच
राजकीय पक्षाच्या बैठका, मेळावे सुरू आहेत त्यांच्यासाठी का संचारबंदी
नाही? असे असताना छोटे मोठे व्यापारी, कष्टकरी, शेतमजुर, अनेक लहान मोठे उद्योग धंदे बंद केले आहेत
त्यांच्यासाठीच फक्त संचारबंदी आहे की काय? या कलावधीत विविध
राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत आहेत त्यांच्यासाठी शासनाचे आदेश लागू पडत नाहीत काय? केंद्र सरकार व राज्य सरकार मोठ्या उद्योग धंदे वाल्यांसाठी वरदान ठरत असून
लहान व्यापारी यांना मात्र शाप ठरत आहेत म्हणून असे म्हणावे वाटते की, “भगदाड मोकळे आणि मोरीला गोळा” त्याचप्रमाणे
सरकारने मंदिरे खुली करावी त्यामुळे व्यापारी वर्गाला समाधान मिळेल व त्यांच्या पोटापाण्याचा
प्रश्न सुटेल इतकेच.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.