संपादक
पुण्यातील पोलिस अधिकारी यांची “बिर्याणी”
खाण्याची फुकटीगिरीची क्लिप प्रचंड प्रसिद्धी आलेली आहे. अधिकारी यांना प्रचंड पगार
असताना फुकटात जबरदस्तीने व्यवसायधारकांना वेठीस धरून खाणे,
पिणे, पैशाची मागणी करणे असे समजते परंतु या पुण्यातील पोलिस
अधिकारी यांच्या “बिर्याणी” ते ही फुकटात ते ही चांगल्या दर्जाची,
जिभेला चव देणारी, आत्मा थंड करणारी अशी बिर्याणी पोलिस अधिकारी यांनी मागितली.
जे पोलिस ठाणे व त्यांच्या हद्दीतील व्यवसायधारकांना पोलिस खाते अधिकारी,
कर्मचारी यांची फुकटात मिळेल ते घ्यायचे असेच पोलिस खात्याचे उद्दीष्ट आहे काय?
असे संपादक म्हणून वाटते. पोलिसांची नोकरी म्हणजे पगार सोडून व्यवसायधारकांकडून जबरदस्तीने
हव्या त्या वस्तु घेवून जाणे, फुकटात जेवण मिळवणे आहे काय?
पुण्यातील अधिकारी यांचा "बिर्याणी" खाण्याचा मोह सध्या गाजत आहे. सध्या धाबेवाले,
हॉटेलवाले, कोणतेही व्यवसायधारक पोलिस खात्याचे “गुलाम” झाले आहेत
असे वाटते. पोलिस खात्याची जबरदस्ती यामुळे व्यवसायधारक यांना तोटा सहन करून अधिकारी,
कर्मचारी यांचा आत्मा थंड करावा लागत आहे. पोलिस बांधवांनो हे वागणे बरे नाही आणि त्यातल्यात्यात
“फुकटेगिरी” ही तर मुळातच करू नका. पगार आहे त्यामध्ये समाधानी राहा,
वर्दीचा मान ठेवा, वर्दीला काळिमा लागेल असे कृत्य करू नका,
तुमचे चांगले वर्तन तुम्हास उच्च पदापर्यंत पोहचवण्यासाठी दिशा देणारे आहे. फुकटाची
सवय तुम्हाला उदवस्त करू शकते. सन्मानाने देणारे आहेत त्यांच्याकडून जरूर घ्या परंतु
हुकुमशाही करू नका. इतभर पोट भरण्यासाठी जिभेचे लाड पुरवण्यासाठी आत्मा थंड करण्यासाठी
व्यवसायधारकांचे नुकसान करून तुमचे पोट भरू नका. व्यवसायधारक हे आपलेच बांधव आहेत असे
समजून पैसे देवून जेवण बिर्याणी खावा फुकटात खाऊ नका. तुम्ही फुकटात व्यवसायधारकांच्या
धाब्यात हॉटेलमध्ये जेवत असाल तर तुम्हाला समाधान मिळेल झोप चांगली येईल पण व्यवसायधारक
तळमळ करतील, त्यांचा आत्मा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला शाप देत राहील.
तुम्ही फुकटात जेवण बिर्याणी खाचाल पण त्याचे सोने होणार नाही,
“नरकच” होईल याचा विचार करा. सध्या पोलिस खात्याला ग्रहण लागले आहे. पोलिस खात्याचे
अधिकारी व कर्मचारी सदैव दुपारी,संध्याकाळी हॉटेल,
ढाबे याठिकाणी जेवताना पाहत आहे परंतु ते फुकटात जेवत असतील असे कधी वाटत नव्हते परंतु
पुण्याच्या बिर्याणीची पोलिस अधिकारी यांच्या फुकटीगिरीमुळे आज सिद्ध होत आहे की,
पोलिस खाते हे पदाचा गैरवापर करून धाबेवाले व हॉटेलवाले इतर व्यवसाय करून ज्या वस्तु
फुकटात घेण्याची सवयच लागली आहे ते सध्या पाहावयास मिळत आहे. पोलिस अधिकारी,
कर्मचारी यांची पोलिस खात्याची नोकरी प्रामाणिकपणे व मिळालेल्या पगारात समाधानी समजून,
आपले कर्तव्यपार पाडलेले असंख्य माझे मित्र, माझा मित्र,
माझा पोलिस अधिकारी बांधव मी पाहिले आहेत. सध्यातर तरुण युवक,
युवती पोलिस खात्यात भारती झाल्यामुळे त्यांना “घमेंड” फार आहे हे दिसत आहे. परिवर्तनानुसार
त्यांच्यात गर्व निर्माण झाला आहे पण जनता ही तेवढीच हुशार झाली आहे. अधिकारी,
कर्मचारी यांची कशी जिरवायची यामध्ये हुशार झाले आहेत. त्याचप्रमाणे सध्यातर या पुण्यातील
अधिकारी यांनी फुकटेगिरी बिर्याणीची खमंग चर्चा जोरात सुरू आहे. तसेच अनेक विभागात
अधिकारी कर्मचारी फुकटीगिरीचे सेवक बनले आहेत. त्याचप्रमाणे माझ्या कानावर आलेले म्हणजे
धाब्यावर फुकटात जेवण करणारे म्हणजे वीजवितरण कंपनीचे वायरमेन यांचीही फुकटीगिरी समोर
येत आहे. बिनधास्त वीज चोरी करा, प्रकाश झोतात राहा पण फुकटात जेवण द्या असे
ढाबेवाल्यांना म्हणत आहे हे ही समजले आहे आणि त्यांचाही पर्दाफाश संपादक या नात्याने
यापुढे करणार आहे. कोणत्याही खात्यातील जे अधिकारी, कर्मचारी त्यांनी फुकटीगिरी करू नये,
जास्तकाळ फुकटचे टिकत नाही. कितीही फुकटची सवय असेल तर तुम्हास बघितल्यानंतर तो व्यवसायधारक
तुमचे आडनाव फुकटे असेच ठेवतो. बिर्याणी ऐवजी आत्ता त्या अधिकारी यांना नामुस्की पत्करावी
लागणार आहे. कोणतीही नोकरी करत असताना अधिकारी,
कर्मचारी यांनी दामाजी जवळ बाळगून हौस भागवावी, फुकटात खाऊन नव्हे. अधिकारी,
कर्मचारी यांनी फुकटची सवय मोडून स्वता:मध्ये बदल घडवावा हे प्रतिष्ठित लक्षण असू शकते.
पुण्यातील फुकटचे बिर्याणीतील ग्रहखात्याने दखल घेतली हे ही समजते. इतकेच.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.