संपादक
सध्याच्या काळात जातिवादी यांना माज चढला
आहे. सध्या कुठे ना कुठे महाराष्ट्रात अनुसूचित जातीजमाती वरती अन्याय अत्याचार जातिवादी
समाजकंटक करीत आहेत. त्यामध्ये जास्त करून ग्रामीण भागातील ज्या ग्रामपंचायत आहेत त्यामधील
जे सरपंच, उपसरपंच, सदस्य आहेत तसेच इतर समाजकंटकाकडून मोठ्या
प्रमाणात अनुसूचित जाती-जमाती वरती अन्याय-अत्याचार, मानहानी, अपमान, नाशवंत पाणी पिण्यास सांगणे, बेकायदेशीर जमिनी बळकावणे, भीक मागावयास लावणे, दृष्टहेतूने कारवाई करणे, चुकीची खोटी माहिती अधिकारी
यांना देणे, दमदाटी करणे, विनयभंग करणे, लैंगिक छळ करणे, पाणी दूषित करणे, जबरदस्तीने घरजागा सोडावयास लावणे, गाव सोडावयास लावणे, अतिक्रमणे नियमित करण्यास ठराव न करणे, खून करणे, जाणूनबुजून घर पाडण्याबाबत नोटिसा काढणे, जाणूनबुजून
अनुसूचीत जातीच्या कुटुंबाच्या घरापर्यंत रस्ता करणे व घर रस्त्यात बांधले म्हणून खोटा
आरोप करणे, स्मशानात मयताचे दहन करण्यास विरोध करणे, जातीवरून
शिव्या देणे, सार्वजनिक ठिकाणी नाहक बदनामी करणे, मानसिक छळ करणे, ग्रामपंचायतकडे घर नियमित करण्यासाठी
अर्ज दिला असता अनुसूचित जातीजमातीचे कुटुंब समजून त्या अर्जाची दखल न घेणे तसेच महामानव
भारतीय घटनेचे शिल्पकार प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक भाषा वापरणे, लिखाण करणे, विधाने करणे, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने महान असा कायदा दिला त्याचा अवमान करणे इ. गंभीर
स्वरूपाची गुन्हे समाजकंटक करीत असतात त्यामुळे त्यांच्यावरती अॅट्रोसिटी अॅक्ट या
कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केलेच पाहिजेत त्यामध्ये गैर काहीच नाही. जातिवाद्यांना
माहिती आहे की दलित समाजामध्ये एकसंघपणा नाही याचाच फायदा घेवून जातिवादी, हरामखोर, भडवे, भाडखाऊ, नालायक महिला विनाकारण समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कट कारस्थान
करीत आहेत. सामाजिक तेढ निर्माण करून गाव व शहरातील वातावरण दूषित करीत आहे. अशा समाजकंटकांना
धडा शिकवण्यासाठी सर्व दलित संघटनेचे एकमत महत्वाचे आहे. संघटना वेगवेगळी असुदया परंतु
अन्याय अत्याचार करणारे जे भडवे आहेत त्यांना जोर का झटका देण्यासाठी सर्वांनी एकत्रित
येणे काळाची गरज आहे. त्या समाजकंटकाचा हिशोब चुकता करणे हे दलित संघटनेचे सर्वांचे
कर्तव्य आहे. माळेवाडी (बोरगाव) येथील मातंग समाजातील धनाजी साठे या मृत व्यक्तीच्या
देहाची त्याच गावातील जातीवादी समाजकंटकांनी अवहेलना केली आहे त्या जातीवादी समाजकंटकाचा
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना जाहीर निषेध करीत आहे. जास्त प्रमाणात ग्रामीण भागात
जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत मधील भाडखाऊ सरपंच, उपसरपंच, सदस्य कारणीभूत आहेत. जातिवादी समाजकंटकाने
डोके वर काढले आहे त्या जातिवाद्यांना हिसका दाखविला पाहिजे. दलित संघटनेचे एकेचे बळ
फार महत्वाचे आहे. सर्व गटतट, पक्ष, सामाजिक
संघटना या सर्वांनी एकत्र येवून समाजकंटकांच्या ७० पिढीच फडक फाडण्यासाठी एकसंघपणा
महत्वाचा आहे. जातिवादी यांना मोकाट सोडता कामा नये. समाजकंटकाच्या मुसक्या आवळण्यासाठी, लढा देण्यासाठी आपली ताकत महत्वाची आहे. आपल्याच बांधवाचे आपणास रक्षण करावयाचे
आहे ही जबाबदारी सर्व दलित संघटनेचे आहे. सर्वांनी मतभेद चुलीत घालावे. आपला एकसंघपणा
हेच आपले बळ आहे. प्रत्येक समाजामध्ये असे पात्रताहीन लायकी नसलेले समाजकंटक आहेत त्यामुळे
अशा समाजकंटकापासून प्रत्येक समाजाने सावधगिरी बाळगावी तसेच जे समाजकंटक माथी भडकावण्याचे
काम करतात तेढ निर्माण करण्याचा कट रचतात अशांना त्यांची लायकी दाखवावीच लागेल.
समाज
जागृतीसाठी जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.