संपादक
कै.आ.भारत नाना भालके यांचे निधन झाले त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील पोट निवडणूक लागली आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मतदार राज्याचे पवित्र मत आमदार होण्यासाठी उमेदवाराला कारण ठरणार आहे. एक एक मत या उमेदवारासाठी मौल्यवान कामगिरी पार पाडणार आहे. गेली सात वर्षे पंढरपूर-मंगळवेढा या मतदार संघात संघटनेची बांधणी करण्यासाठी व कार्यकर्त्याची जुळवाजुळव करीत असून या मतदार संघात जवळपास एक हजार कार्यकर्ते यांनी बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेत सक्रिय झाले आहेत. कासव गतीने संघटनेचे काम चालू आहे. या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील उमेदवार हा बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेच्या मतामुळे आमदार होणार आहे. १००० X ५= ५००० एवढे कार्यकर्ते माझ्या संघटनेतून मतदान करणार आहेत. संघटना स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी संघटना उभी राहणार आहे. भ्रष्टाचारी, बनवाबनवी अशा उमेदवाराला संघटना मतदान करणार नाही. उमेदवाराची चाचपणी करून जनतेतील उमेदवार जो उमेदवार आहे त्याच उमेदवाराला संघटनेचे प्रमुख मतदान करण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. कोणत्याही उमेदवारांनी आर्थिक लक्ष्मीचा वापर केला तरी ज्या उमेदवाराच्या पाठीशी माझ्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत व त्याच उमेदवाराला मत टाकून निवडून देऊन आमदार करणार. कितीही ज्या त्या पक्षाचे, संघटनेचे नेते मंडळी येऊन भाषणे देतील. भाषणे दिल्यामुळे मतदार राज्याला राशन मिळणार नाही असे संघटनेचे संस्थापक अभिमन्यू आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे व्यक्त केले आहे.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक :
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव
अ. आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार