संपादक
पुढील वर्षापासून ज्या वाहनांना १५ वर्षे पूर्ण झाले आहेत ती वाहने भंगारात काढावे, त्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही असा प्रस्ताव केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाचा आहे. परंतु ज्या परिस्थितीतुन वाहने ज्या कुटुंबाने घेतली आहेत त्या कुटुंबाला आर्थिक तोटा मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे. वाहन धारकांचे प्रचंड नुकसान होणार आहे ते कुटुंब उध्वस्त होणार आहे, अधोगतीकडे जाणार आहे याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. केंद्र सरकारने जनतेचा फायदा बघावा जनतेचा तोटा बघू नये. जनतेचा तोटा करून काय आनंद मिळणार आहे सरकार ला? जनतेने अच्छे दिन येतील म्हणून मतदान केले आहे सत्ता दिली. कुठे गेले ते अच्छे दिन? चांगले निर्णय का घेत नाही? वाईट निर्णयच का सुचतात? जुने वाहने सरकारनेच ताब्यात घेऊन त्याचा मोबदला द्यावा. ज्या प्रमाणे रस्ते करीत असताना त्या शेतकऱ्यांच्या जागा, जमिनी, घरे, दारे, झाडे-झुडपे यांचे नुकसानाबाबत त्या शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो, नुकसान भरपाई दिली जाते. त्याच धर्तीवरती जुने वाहने केंद्र सरकारने ताब्यात घेऊन त्याचा मोबदला द्यावा, वाहनधारकाचे नुकसान करू नये. जुने वाहने भंगारात घालून वाहन धारकाचे प्रचंड वाटोळे होणार आहे. केंद्र सरकारने जुन्या वाहनाबाबत घेतलेला निर्णय मागे घेऊन त्या वाहनाचे नूतनीकरण करण्यासाठी आदेश काढावा. जुन्या वाहनापासून काय प्रदूषण होते? सरकारचे असलेले डिझेल, पेट्रोल यामधील भेसळयुक्त पदार्थ आहेत त्यापासून प्रदूषण होत आहे. यासाठी डिझेल, पेट्रोल मधील भेसळयुक्त पदार्थ बंद करावेत व स्वच्छ डिझेल, पेट्रोल वाहन धारकांना द्यावे अशी सुधारणा करावी जेणेकरून प्रदूषण होणार नाही याकडे सरकारने लक्ष द्यावे. जुनी वाहने भंगारात काढून वाहन धारकाचे नुकसान व तोटा करू नये या निर्णयाबाबत वाहनधारकाने आंदोलने करावीत. जुनी वाहने सरकारने ताब्यात घेऊन नवीन वाहने वाहन धारकांना सरकारने द्यावेत. जनतेचे हित सरकारने बघावे, जनतेचे वाटोळे बघू नये. वाहनधारकांनी जुनी वाहने हळदी कुंकू लावून पूजत बसावे का? परिस्थितीनुसार गोर गरिबांनी वाहने घेतली आहेत त्यांच्यावरती ही सरकारचे संकट. सरकारला चांगले निर्णय का दिसत नाहीत? वाटोळेचे निर्णय का घ्यावे वाटतात? वाहनांच्या स्पेअर पार्टमुळे प्रदूषण होत नाही. सरकारच्या भेसळयुक्त इंधनामुळे प्रदूषण वाढत आहे त्यासाठी उपाय शोधावा. स्पेअर पार्टमुळे प्रदूषण वाढत नाही हे लक्षात घ्यावे. इंधनामधील चुका शोधाव्या. जुनी वाहने भंगारात न काढता त्याचे नूतनीकरून करण्यासाठी आदेश जारी करावा त्यामुळे वाहनधारक आनंदी होतील त्यांना दुःख व वेदना होणार नाहीत इतकेच.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार