संपादक
गेल्या वर्षभरापासून जगाला कोरोना कोव्हिड-१९ या रोगाने "सळो की पळो" करून सोडले आहे. कोरोना या रोगाची आपत्ती डॉक्टरांसाठी "वरदान" ठरत आहे. या रोगामुळे डॉक्टर मालामाल होत आहेत. यामध्ये जगण्यासाठी कोरोना या रुग्णाची धडपड चालू आहे तर पैसे कमवण्यासाठी डॉक्टरांची धडपड चालू आहे. मला प्रश्न पडतो की, कोरोना या रोगावरती औषध, गोळ्या, इंजेकशन इ. नाहीत. ज्या डॉक्टरांकडे कोरोना झालेल्या व्यक्ती उपचारासाठी दाखल होतात त्यांना डॉक्टर कसे काय उपचार करतात? डॉक्टरांकडे कोरोना पेशंट बरे करण्यासाठी कोणते औषध उपलब्ध आहे जेणेकरून डॉक्टर कोरोना झालेल्या व्यक्तीवरती उपचार करतात. एकतर सरकारकडे REMDESIVIR या इंजेकशनाशिवाय दुसरे औषध नाही. मग डॉक्टर कोरोना रुग्णावर कोणत्या औषधाचा उपचार करतात. आज कोरोना झालेल्या व्यक्ती मिळालेले जीवन जगता यावे, मरण येता कामा नये म्हणून घर, जमीन, सोने, चांदी, जनावरे विकून वेळप्रसंगी सावकाराचे व्याजाने पैसे काढून डॉक्टरांची पेमेंट फी भरतात. कोरोना या रोगाने जनतेला घायाळ केले आहे तर त्यापलीकडे जाऊन डॉक्टरांनी ही कोरोना रुग्णांना भरमसाठ फी आकारून घायाळ केले आहे. कोरोना या रोगामुळे डॉक्टरांचा धंदा मात्र तेजीत चालू आहे. "पेशंट मरो अथवा जगो" फी मिळाली म्हणजे झाले हेच डॉक्टरांचे चालले आहे. सरकारकडे कोरोना या रोगावर औषध नाही मग या डॉक्टरांकडे कुठून औषध येतात हा एक चमत्कार म्हणावा लागेल. सरकारचा डॉक्टरांच्या डोक्यावर हात आहे काय? किंवा सरकारकडून आतल्या हातून कोरोना रोगावर औषध पुरवठा केला जातो की काय? असे संपादक म्हणून माझ्या मनात येते. औषध उपलब्ध नसेल तर कोरोना रुग्णावरती डॉक्टर कसे काय उपचार करतात. कोरोना या रोगाचा रुग्ण बरे करण्यासाठी डॉक्टरांकडे "भानामती" गोट्याचा खेळ आहे काय? जेणेकरून कोरोना या रोगावर डॉक्टर उपचार करतात, का सरकारची जनतेसाठी अशीही बनवाबनवी चालू आहे काय? डॉक्टरांनी बिनधास्तपणे पैसे कमवा ही सरकारची योजना आहे काय? कोरोना या रोगावर औषध नाही. डॉक्टर कसे काय उपचार करतात हा मला पडलेला प्रश्न आहे. डॉक्टरांनी कोरोना झालेल्या व्यक्तीवरती उपचार पैसे कमावण्यासाठी करू नये तर त्यांना जीवनदान देण्यासाठी उपचार करावे. कोरोना हा व्यक्ती जगला पाहिजे, बरा झाला पाहिजे यासाठी झटावे. पैसे कमावण्याची वेळ आहे म्हणून नीतिमत्ता ठेऊ नये. कोरोना झालेल्या व्यक्तींना डॉक्टर म्हणजे देवदूत वाटावे, यमदूत वाटू नये. कोरोना झालेल्या व्यक्तीवरती उपचार करताना पुण्य समजून उपचार करावेत पाप समजून करू नयेत. कोरोना व्यक्ती मरो अथवा जगो मला दक्षिणा मिळाली म्हणजे झाले अशी प्रवृत्ती ठेऊ नये. ज्या डॉक्टरांच्या दवाखान्यात कोरोना या रोगाचा रुग्ण ऍडमिट झाला होता त्या डॉक्टरांनी कोणते उपचार केले गेले त्या डॉक्टरांचा पुढील काळात संपादक म्हणून पर्दाफाश करणारच. कोरोना झालेली व्यक्ती हि आपल्याच कुटुंबातील आहे असे समजून डॉक्टरांनी ती व्यक्ती बरी करावी. तसेच उपचार करून ही कोरोना या रोगाचा व्यक्ती मयत झाली तर त्याची झालेली फी थोडीफार घेऊन खर्च वगळता परत देऊन टाकावी असे वाटते.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार