संपादक
आमदार कै. भारतनाना भालके यांचे निधन झाल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे पोटनिवडणूक लागली. मतदान प्रक्रिया पार पडली. ०२ मे ला निवडणूक निकाल आहे परंतु या पोटनिवडणुकीमुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील गावे व त्यामधील जनतेला कोरोनाची लागण मोठया प्रमाणात झाली असून मृत्यूचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. ज्या बांधवांनी या पोटनिवडणुकीत आपले पवित्र मत उमेदवाराला दिले असेल परंतु जय पराजय बघण्यासाठी ते मतदार नाहीत हे वेदनादायी व चिंतातुर बाब आहे. या पोटनिवडणुकीवेळी नेत्यांची भाषणे, प्रचार व जनतेची गर्दी झाल्यामुळे कोरोना झालेल्या व्यक्ती या गर्दीत मिसळल्यामुळे या रोगाचा जलदगतीने प्रसार झाला आहे. पंढरपूर-मंगळवेढा या मतदार संघातील जी गावी व जनता आहे ती पूर्णपणे भयभीत झाली आहे. मृत्यूचे संकट डोळ्यासमोर उभे आहे. दरोरज कुठे ना कुठे या मतदार संघातील गावातील व्यक्ती मरण पावत आहेत. ही पोटनिवडणूक जनतेवर संकट व शाप ठरणारी वाटत आहे. असंख्य व्यक्तींना कोरोना या रोगाची लागण झालेली आहे. अजून ०२ मे ला निकाल लागणार आहे त्यावेळीही गर्दी प्रचंड होईल. त्यावेळेलाही मोठ्या प्रमाणात जनतेला कोरोना या रोगाची लागण होईल त्यामुळे निकाल लागण्याअगोदर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी संचारबंदी व जमावबंदी ०२ मे ला लागू करावी. त्यामुळे थोडातरी फरक पडेल झपाट्याने कोरोना या रोगाची साथ पसरत चालली आहे. ही निवडणूक जनतेच्या मुळावर उठली असे म्हंटले तर वावगे होणार नाही. ही निवडणूक रद्दच केली पाहिजे होती. निवडणूक महत्वाची नव्हते, जनता महत्वाची होती. देवालये, शाळा, मार्केट, दळणवळनाच्या सुविधा बंद असताना अशा प्रकारचे निवडणूक घेणे योग्य नव्हते. परंतु झाले गेले निकालादिवशी तरी जमावबंदी, संचारबंदी लागू करावी असे वाटते. परंतु या पोटनिवडणुकीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, जगाचा निरोप घ्यावा लागला हे मात्र सत्य आहे. ही निवडणूक जनतेसाठी शाप ठरली आहे. तरी कोरोना या रोगाची लागण होऊ नये यासाठी सोलापूर जिल्हा अधिकारी साहेबांनी ०२ मे ला होणाऱ्या निकालावेळी गर्दी होणार आहे त्यासाठी निर्णय घ्यावा नाहीतर कोरोना या रोगाची लागण होऊन मृत्यूचे प्रमाण वाढेल इतकेच.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार