संपादक
गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना कोव्हिड-१९ या रोगामुळे देशात लॉकडाऊन केले गेले. संचारबंदी, जमावबंदी केली गेली परंतु याकडे जनतेने दुर्लक्ष केले. बेफिकीरपणा, अहंपणा जनतेचा दिसून आला. शासन वेळोवेळी नियमाचे पालन करा अशा सूचना देऊन सुद्धा जनता त्याचा विचार करत नाही. मास्क वापरणे, सॅनिटायझर चा वापर करणे, अंतर ठेवणे हे जनतेच्या हातातील उपाय आहेत त्या उपायाला जनता बगल देत आहे मग सरकारने काय करावे? जनता जाणून बुजून शासनाच्या नियमाचे भंग करीत आहे त्यामुळे सरकारला लॉकडाऊन करणे भाग पडत आहे. लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. प्रत्येक व्यक्तीने या कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या अपत्य काळात स्वतःचे, कुटुंबाचे व इतरांचे संरक्षण केले पाहिजे. जनतेच्या वागण्यामुळे शासनाला लॉकडाऊन हा पर्याय निवडावा लागत आहे. देश २०१४ पासून बरबादीकडे गेला आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कंपन्या बंद पडल्या आहेत, युवकांच्या हाताला काम नाही, शिक्षणाच्या बारा वाजल्या आहेत. मुलामुलींच्या लग्नाचा प्रश्न उभा आहे. जगणे अवघड झाले आहे, मरण डोळ्यासमोर उभे आहे. सरकार चालवणारे मात्र कारभारी मजेत आहेत. झेड सुरक्षा अवतीभवती ठेऊन अगदी सरकार जगाच्या पाठीवर फिरून आनंद लुटत आहे. अच्छे दिनाचे गाजर दावले जनता भुलली व सत्ता दिली त्याच सरकारने जनतेचा विश्वासघात केला असे सहन करीत असताना लॉकडाऊन करण्यासाठी जनताच जबाबदार ठरत आहे. सध्या नियमाचे पालन जनता करीत नाही. लॉकडाऊनमध्ये जनतेच्या हलगर्जीपणामुळे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. त्यामध्ये पोलीस बांधवांकडून जनतेवर अन्याय होत आहे तो म्हणजे हॉर्न आहे का? लायसन्स आहे का? लाईट आहे का? हवा कमी का? टायर नवीन का टाकले नाहीत? पेट्रोल, डिझेल भरपूर का नाही? आरसा का नाही? मास्क का नाही? या पद्धतीने पोलीस बांधव जनतेला वेठीस धरत आहेत हे जनतेमुळे. जोपर्यंत जनता भयानक कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या काळात काळजी घेत नाही तोपर्यंत असे निर्णय सरकारला घेणे बंधनकारक आहे. सध्या या दुसऱ्या लाटेत मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. जाळण्यासाठी स्मशानभूमीची जागा कमी पडत आहे. सरपण कमी पडत आहे हि भयानक परिस्थिती आहे. सन २०१४ पासून या देशावर संकटावर संकटे येत आहेत. सरकार हे अपशकुनी आहे काय? असे चित्र दिसत आहे. जनतेवर व देशावर राज्यकर्त्यांची मनमानी त्यामध्ये कोरोना या रोगाच अपत्याचा काळ त्यामध्ये जनतेचा मीपणा बघायला मिळत आहे. मिळालेले जीवन तरी नियमाच्या चौकटीत राहून जगावे हि प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामध्ये सरकारला दोषी ठरवण्यात अर्थ नाही. जबाबदारी जनतेची पण आहे. देशाच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत त्या शेतकऱ्याकडे देशाच्या सरकारला बघायला वेळ नाही परंतु इतर राज्यात लागलेल्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी देशाच्या सरकारला वेळ आहे. ही चीड आणणारी भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे जनतेने या रोगाच्या आपत्तीत स्वतःचे, कुटुंबाचे व इतरांचे बरेवाईट होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. विरोधकांना राजकारण महत्वाचे वाटत आहे. परंतु आपत्ती काळात जनतेसाठी सर्वानी एकसंघपणे या संकटावर मात करण्यासाठी यावे इतकेच.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार