प्रतिनिधी (पंढरपूर)
वाखरी
ता.पंढरपूर, जि.सोलापूर या गावची निवडणूक होऊन वाखरी गावचे आदर्श सामाजिक कार्यकर्ते जनतेला
मान सन्मान देणारे, आदर देणारे, जनतेच्या
हाकेला धावून येणारे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा.संग्राम ज्ञानेश्वर गायकवाड यांना
जनतेने मत देवून पुन्हा ग्रामपंचायतमध्ये पाठविले आहे. मागील पंचवार्षिकमध्येही ते
ग्रामपंचायतमध्ये सदस्य होते. जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी, त्यांची कामगिरी जनतेला पसंद
पडल्यामुळे व त्यांच्यावरती विश्वाश असल्यामुळे वाखरीतील वार्ड क्र.५ मधील मतदारांनी आपले पवित्र मत देवून मतदारांनी
निवडून आणले आहे. संग्राम ज्ञानेश्वर गायकवाड म्हणजे गोरगरीब जनतेसाठी झटणारे आदर्श
कार्यकर्ते आहेत. संग्राम गायकवाड यांना अनेकांनी विरोध दर्शिवला होता. ते कसे पराभूत
होतात हेच लक्ष होते परंतु जनतेसाठी जो झटतो त्याला जनता कधीच विसरू शकत नसते. सर्व
गुण संपन्न लोकप्रिय असलेले संग्रामजी गायकवाड यांची ग्रामपंचायतमध्ये पुन्हा प्रवेश
झाल्यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. संग्राम गायकवाड यांनी ज्ञानेश्वर फाऊडेशन च्या
वतीने उत्कृष्ठ असे सामाजिक कार्य चालू केले आहे. तसेच वार्ड क्र.५ मधून सौ.वर्षा युवराज
पवार व दत्तात्रय भारत लोखंडे हे नूतन सदस्य निवडून आले आहेत. सर्व वार्डातून निवडून
गेलेल्या सदस्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा...!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी.
आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक
बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र
राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसले, जे
अनुभवले, जे
पाहिले, तेच
लिहले