संपादक
सध्या ग्रामपंचायतच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागल्या असून असंख्य गाव पातळीवर बिनविरोधी सदस्य निवडले आहेत. तर काही ग्रामपंचायती बिनविरोधी झाल्या आहेत पण हे लोकशाहीसाठी “घातक” आहे, हा लोकशाहीचा “खून” आहे, लोकशाहीसाठी “शाप” आहे. जनतेला संविधानाने दिलेले मत न टाकता बिनविरोधी सदस्य निवडले ते योग्य नाही केवळ मतलबी पुढार्यांनी एकत्र येऊन आपआपल्या सोयीनुसार उमेदवार द्यायचा आणि बिनविरोधी पुढार्यांनी ना वार्डातील जनतेने, ना गावातील जनतेने हजर रहायचे, फक्त पुढार्यांनी संघमताने गावाची ना वार्डाची मीटिंग न घेता उमेदवार बिनविरोधी करतात ही पद्धत लोकशाहीसाठी घातक व चीड आणणारी, चिंता करणारी अशी आहे. बिनविरोधी सदस्य निवडताना त्या सदस्याची सामाजिक कामगिरी काय? तो वार्डात किंवा गावात सर्वधर्म समभाव वागतो का? मिसळतो का? तो अवैद्य धंदे करणारा आहे का? त्याची पात्रता काय? वार्डातील जनता तसेच गावातील जनतेला तो मान्य आहे का? तो वार्डातील व जनतेची व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटेल का? स्वच्छ प्रतिमेचा आहे का? तो घमेंडीत वागतो का? इ. प्रश्नासाठी तो यशस्वी ठरेल का याचाही विचार पुढार्यांनी केला पाहिजे. केवळ भांडणतंटे, वादविवाद व पैसा खर्च होईल यामुळे बिनविरोधी सदस्य निवडणे योग्य नाही. पुढार्यांनी एकत्रित बसून गावातील किंवा वार्डातील जनतेला विश्वासात न घेता सदस्य निवडू नयेत व जनतेवर लादू नयेत. जनतेला संविधाने दिलेले पवित्र मत त्या मताला वार्यावरती सोडून बिनविरोधी निवड करणे अयोग्य आहे. बिनविरोधी निवडून आलेले सदस्य वार्डातील किंवा गावातील जनतेची कामे करतील का? का जनतेला म्हणतील मी कुठे मत मागायला तुमच्याकडे आलो होतो. बिनविरोधी झालेल्या सदस्याकडे कामे घेवून जाता येत नाहीत. त्यांच्यावरती तसा अधिकारही पोहचत नाही. तो सदस्य आपआपसातील पुढार्यांचा असतो तो जनतेचा नसतो त्यामुळे बिनविरोधी निवडणूक म्हणजे पुढार्यांसाठी “वरदान” ठरू शकते. बिनविरोधी निवडणुकीमुळे जनतेच्या पवित्र मताला “केराची टोपली” दाखवली जाते असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. बिनविरोधी निवड झालेल्या सदस्यावर जनतेला जनतेचा अधिकार पोहोचतो का हे सांगता येत नाही. निवडणूक लढवून जे सदस्य जाणार आहेत त्यांच्यावरती त्या वार्डातील जनतेचा हक्क असतो असे वाटते. बिनविरोधी निवडणूक म्हणजे जनतेच्या मतावर आघात असा आहे. बिनविरोधी निवडणूक म्हणजे लोकशाहीची “थट्टा “ आहे हे संपादक म्हणून माझे मत आहे. बिनविरोधी जे सदस्य झाले त्यांना जनतेला जास्त बोलता येणार नाही त्यामुळे बिनविरोधी निवडणुका म्हणजे “आपण सगळे भाऊ-भाऊ आलेला निधी वाटून खाऊ” अशी भूमिका राहू शकते. बिनविरोधी निवडणुकीमुळे विकास होईल की नाही हे सांगता येत नाही. कारण जनतेने निवडलेले ते सदस्य नाहीत. कारण आपआपसातील पुढार्यांनी एकत्र बसून निवडलेले ते जनतेचे सदस्य नसून ते पुढार्याचे सदस्य असणार आहेत. बिनविरोधी निवडणुकीला काही अर्थ नाही. अशा निवडणुका म्हणजे पुढार्यांचा मनमानी कारभार, विकास काय केला असे कोणी म्हणाले तर सदस्य, पुढारी म्हणणार की आम्ही कधी तुमच्याकडे मत मागितली. बिनविरोधी निवडणूका म्हणजे लोकशाहीसाठी विश्वासघात म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. निवडणुका कोणत्याही असुदया त्या जनतेच्या मतावरती झाल्या पाहिजेत. बिनविरोधी निवडणुका होणे म्हणजे पुढार्याची हुकुमशाही म्हणावी लागेल. बिनविरोधी सदस्य निवडताना पुढार्यांनी वार्डात गावात बैठका घेऊन उमेदवाराची नावे सुचवून जनतेचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वानुमते तो उमेदवार निवडावा. बिनविरोधी निवडणुकीमुळे जनतेच्या मतावर अन्याय आहे त्यामुळे निवडणुका जनतेच्या मतानुसारच झाल्या पाहिजेत असे वाटते त्यासाठी सरकारने बिनविरोधी निवडणूक घेण्यास प्रतिबंध करावा व जनतेला संविधानाने दिलेल्या मतानुसार आपला उमेदवार निवडून देण्याचा हक्क असावा असे वाटते.
जनहितार्थ माझे मत
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार