मा.श्री.संदिप (दादा) ठोंबरे नूतन ग्रामपंचायत सदस्य, नातेपुते |
संपादक
संदिप (दादा) ठोंबरे हे लहान थोरांचे आशास्थान झाले आहेत. प्रत्येक व्यक्ति तो लहान असेल मोठा असेल त्यांना आदर देणे, मान सन्मान देणे ही संदिपदादांची भूमिका असते. दादांना माणसांची “पारख” आहे. दादासाहेब आपल्याकडे आलेल्या व्यक्तीची गरीबी की श्रीमंती पाहत नाहीत. तो गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला तेवढाच मान देतात. वडील चंद्रकांत (तात्या) ठोंबरे, कै.सुरेश (दादा) ठोंबरे यांच्याकडून सामाजिक व राजकीय धडे मिळाले आहेत त्यामुळे सर्व समाजातील लहान, महान व्यक्ति दादांकडे एक चांगला आदर्श कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. दादांचा स्वभाव अतिशय मनमिळावू असून कधीही कोणावरती रागावले असे पाहिले नाही. सर्वांच्या सुखा-दु:खात सामील असतात. सध्या नातेपुते ग्रामपंचायत मध्ये नूतन सदस्य म्हणून प्रवेश झाला आहे त्यामुळे खूप मोठी जबाबदारी आली आहे. केवळ आपल्या वार्डापुरता विचार न करता नातेपुते गावातील भेडसावणार्या अडी-अडचणी, गावाचा, गावातील जनतेचा रखडलेला विकास याकडे दादासाहेब लक्ष देवून विकास करतील. वंचितांना न्याय देतील संदिप (दादा) म्हणजे नातेपुते नगरीसाठी आशेचे किरण झाले आहेत. त्यांच्याकडे “माझे कर्तव्य माझी जबाबदारी” ही त्यांची भूमिका ग्रामपंचायत मध्ये जनतेच्या व गावाच्या विकासासाठी महत्वपूर्व कामगिरी बजावतील. दादांनी आपत्ती काळात जनतेसाठी आपले कर्तव्य समजून मदत केली आहे. त्यांची हळूहळू घौडदौड चालू आहे त्यांची घौडदौड जनतेसाठी न्याय अशीच राहील. कोणावरतीही अन्याय होऊ नये यासाठी कर्तव्यता दाखवतील व जनतेसाठी, गावासाठी झटतील.
दादासाहेब तुम्ही ग्रामपंचायत मध्ये नूतन सदस्य म्हणून गेलात
त्याबद्दल आपले आठवले परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा...!
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ.
अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण,
साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसले, जे अनुभवले, जे पाहिले, तेच लिहले .