सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना मान्यवर |
संपादक
महाराष्ट्रात
माता-भगिनींना शिक्षणाची दारे मोकळी करून देणार्या भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना
उजेडाची वाट दाखवणार्या “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या जयंतीनिमित्त
तसेच यावर्षीपासून ०३ जानेवारी हा दिवस “महिला शिक्षण दिन” म्हणून साजरा होत आहे यानिमित्ताने
श्री गणेश प्रतिष्ठान यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करून महिला शिक्षिका यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ.बा.ज.दाते प्रशाला नातेपुते, अक्षय शिक्षण संस्था, चंद्रप्रभू
इंग्लिश मिडियम स्कूल, श्रीमती
रत्नाप्रभादेवी कन्या प्रशाला, अंगणवाडी
(ग्रामपंचायत जवळ) इ. विविध शाळेत जाऊन महिला शिक्षिकांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात
आला. यावेळी श्री गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर अटक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा
सरचिटणीस रियाज शेख, किरण घनवट, वैभव आठवले, रवी वाघमारे, गणेश सावंत, सोमनाथ पोळ, निलेश भांड, लखन अटक, हर्षल नायकुले, रेहान शेख, अथर्व दळवी, रोहित दळवी, रोहित कुंभार, ऋषिकेश कुंभार, पीयूष अटक, आनंद कुंभार, संग्राम जाधव उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ.
अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण,
साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य