संपादक
आजच्या
घडीला महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत, पंचायत समिति, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, विधान परिषद इ. मध्ये केवळ मोजक्याच जातीतील व्यक्तींना लोकसेवक बनविण्याची
पुढार्याची भूमिका असते. त्यामध्ये गाव पातळीवर मराठा, महार, मातंग, मुसलमान, घोंगडी धनगर, मेंडकी धनगर इ. समावेश असतो. तर वेळ पडल्यास इतर एखाद्या दुसर्या जातीचा
विचार केला जातो तो म्हणजे ब्राह्मण, वाणी, जैन, बागवान या पलीकडे इतर जातीचा विचार गाव पातळीवर
पुढारी करीत नाहीत हे मी संपादक म्हणून पाहत आहे. त्यामध्ये कोल्हाटी, वडर, लोहार, साळी, गडसी, परीट, कोळी इ. या समाजातील
व्यक्तींना न्याय दिलेला दिसत नाही. तसेच अनुसूचीतील ५९ जाती, अनुसूचीत जमाती ४७ जाती, इतर मागासवर्ग, ओबीसी ३४६ जाती, विशेष मागास वर्ग एसबीसी ७ जाती, विभक्त जाती (अ) व्हीजे (ए) १४ जाती, भटक्या जाती (ब)
३७ जाती, भटक्या जाती (क) एनटी (सी), भटक्या
जाती (ड) एनटी (डी), तसेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एसईबीसी
अशा प्रवर्गातील मोजक्या जातींना पुढार्यांची पसंती असते. इतर जातीने फक्त मतदान करायचे
का? ते कधी लोकसेवक बनणार? सध्या तर घरातच
पद असावे हे पुढार्यांचे चाललेले असते. शेकडो जाती लोकसेवक बनण्यापासून वंचित आहेत.
त्या जाती फक्त मतदान करण्यास आहेत की काय? याचा विचार गल्ली
पासून दिल्ली पर्यंत होणार की नाही? याची खंत वाटते. मी संपादक
म्हणून गाव पातळीपासून दिल्ली पर्यंत मोजक्याच जातीतील व्यक्तींना पुढारी हात मिळवणी
करून आरक्षणानुसार लाभ देतात. आरक्षण नसते तर कोणत्याच जातीला न्याय मिळाला नसता. पुढार्यांची
मनमानी, हुकुमशाही, दडपण याखाली हजारो जातीच्या
लोकांना गुलाम बनावे लागले असते. परंतु माझे मत आहे की गावातील एकूण जाती व त्यानुसार
त्या जातीतील व्यक्तींना न्याय दिला जावा. त्यांनाही सत्तेत पुढार्यांनी सत्तेत वाटा
द्यावा. सतत मोजक्याच जातीचे लोकसेवक सतत बनविणे हे लोकशाहीला घातक आहे. गरीब अथवा
श्रीमंत असा भेदभाव करू नये. मोजक्या जातीतील व्यक्ति घेवूनच पुढारी राजकारण करीत आहेत
हे निंदनीय आहे त्यामुळे गाव पातळीपासून देशपातळी पर्यंत जेवढ्या जाती आहेत त्या सर्व
जातींना प्रत्येक क्षेत्रात लोकप्रतिनिधी म्हणून घेतले तर सर्वांना न्याय मिळेल असे
वाटते.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी.
आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक
बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र
राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसले, जे
अनुभवले, जे
पाहिले, तेच
लिहले