मा.अतुल (बापू) राजेंद्र पाटील (नूतन ग्रा.प.उपसरपंच) |
संपादक
नातेपुते ग्रामपंचायत निवडणूक २०२० च्या
निवडणुकीत जनशक्तीचे ७ सदस्य बिनविरोध झाले. १० सदस्यासाठी विरोधकांनी नागरी
संघटनेमधून उमेदवार उभे केले त्यामुळे बिनविरोध निवडणूक झाली नाही. जनशक्ती विकास
आघाडीकडून नागरी संघटनेचा दारुण पराभव झाला. जनशक्तीचे १७ सदस्य विजयी झाले व
जनतेनी एक हाती सत्ता दिली. वार्ड क्र. २ मधून कांचनाताई लांडगे निवडून आल्या व
वार्ड क्र. ३ मधून अतुल (बापू) राजेंद्र पाटील हे निवडून आले व ग्रामपंचायत मध्ये
सरपंच होण्याचा मान सौ. कांचनाताई लांडगे यांना मिळाला व उपसरपंचपदी (अतुल बापू)
राजेंद्र पाटील यांना मिळाला. सरपंच व उपसरपंच म्हणून नातेपुते ग्रामपंचायत मध्ये
विराजमान झाले. त्यामधून सरपंच, उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम होऊन सरपंचपदी, कांचन (ताई) लांडगे, उपसरपंचपदी अतुल (बापू) पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित जाधव यांनी जाहीर केले. या निवडणूक प्रक्रियेसाठी सहाय्यक ग्रामविकास अधिकारी विक्रम मोरे, तलाठी प्रभाकर उन्हाळे यांनी कामकाज पाहिले. जनशक्ती पॅनेल चे प्रमुख मा. बाबाराजे (दादा) देशमुख, राजेंद्र
भाऊ पाटील, रघुनाथ (अण्णा) कवितके, भांड, उराडे, ठोंबरे
असे नेते एकत्र येऊन त्यांनी जनशक्ती विकास आघाडी स्थापन केली व मतदार राजांनीही
या आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून दिले व नातेपुते गावाचा रखडलेला
विकास करण्यासाठी त्यांना संधी दिली. जे पॅनेल प्रमुख होते त्यांच्या घरातील प्रत्येकी एक सदस्य निवडून गेले आहेत हा एक योगायोग
म्हणावा लागेल. सरपंच उपसरपंच निवडीवेळी बाबाराजे (दादा) देशमुख, राजेंद्र
भाऊ पाटील, रघुनाथ (अण्णा) कवितके, अमरसिंह देशमुख, अँड. भारत उराडे, चंद्रकांत
ठोंबरे, माऊली पाटील, संजय पाटील, मामासाहेब
पांढरे, आप्पासाहेब भांड, अँड.शिवाजीराव पिसाळ, विजय
उराडे, बाळासाहेब पांढरे, अतुल बावकर, सुभाष कुचेकर, केरबा
लांडगे, रणजित काळे, संतोष वाघमोडे, सोमनाथ सावंत, दादा लांडगे इ. ग्रामस्थ हजर होते. ग्रामपंचायत नूतन सदस्य रणवीर
देशमुख, सनम मुलाणी, सोनम उराडे, भारती पांढरे, सुखदेव
ननवरे, प्रकाश साळवे, डॉ.नरेंद्र कवितके, विद्या
सावंत, रंजना पांढरे, अनुराधा उराडे, संदीप ठोंबरे, अजय
भांड, उत्तम बरडकर, शीतल बरडकर यांनी सरपंच उपसरपंच निवडीवेळी
सहभाग घेतला. तसेच सन २०१०-२०१५ या कालावधी मध्ये अतुल (बापू) पाटील यांनी उपसरपंच
म्हणून उत्कृष्ट काम केले आहे
व दुसऱ्यांदा उपसरपंच होण्याचा मान
मिळाला आहे. तसेच
सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते त्यामुळे सरपंच होण्याचा मान सौ.कांचन
(ताई) लांडगे यांना मिळाला
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक :
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव
अ. आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार