Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

अकलूज बस डेपोचा कायापालट करणार :भरत शेठ गोगावले

               उपसंपादक:  वैभव आठवले  (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)                    अकलूज बस डेपोसाठी नवनिर्वाचित एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. भरत शेठ गोगावले यांना शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त यांच्याकडून आळंदीच्या बैठकीत सत्कार करून निवेदन दिले.           निवेदनात म्हटले आहे की, अकलूज बस डेपोला पूर्वी जवळपास 110 बस उपलब्ध होत्या. पूर्ण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, विद्यार्थी हे लालपरीतून प्रवास करीत असे. बस जास्त जुन्या होत गेल्या तशा त्या स्क्रॅप झाल्या, नव्या बस उपलब्ध न झाल्याने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी महिलांसाठी अर्ध  तिकीट योजना लागू केली परंतु लालपरीची संख्या कमी असल्याने तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या लालपरीची संख्या कमी आहे. त्यामुळे माता-भगिनींना याचा लाभ घेता येत नाही. त्याची संख्या ६० वर आली. अकलूज बस डेपोसाठी जवळपास ४५ कर्मचारी अत्यावश्यक आहेत. त्यामध्ये लिपिक, चा...

वडिलांनी केलेल्या कष्टाचे फळ मिळाले - हिवरकर पाटील

   उपसंपादक:  वैभव आठवले  (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)   अ त्यंत हलाखीची परिस्थिती असून सुद्धा माझ्या मुलाला मी पोलीस बनवणारच ह्या स्वप्नाला उराशी बाळगून मूळचे सदाशिवनगर  येथील पिंटू ओवाळ सध्या राहणार पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड येथील भाजी मंडई मध्ये हमाली करणाऱ्या एका बापाचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांचा अनिकेत नावाचा मुलगा अवघ्या 20 व्या वर्षी सोलापूर एस आर पी एफ मध्ये पोलीस पदावर विराजमान झाला. अनिकेत ओवाळ हे सध्या पदवीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहेत बारावी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खूप कष्टाने आणि जिद्दीने अभ्यास करून पोलीस व्हायचं आणि वडिलांचे स्वप्न आहे की मुलाला वर्दी ही मिळालीच पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करून अवघ्या दोनच वर्षात सोलापूर येथे झालेल्या एस आर पी एफ या पदासाठी गवसणी घातली आहे. त्यांचं अभिनंदन करताना  राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी  म्हणाले की खूप कमी वयात मोठी जबाबदारी तुमच्यासारख्या वीर जवानांच्या हाती आली म्हणजे आपला भारत देश पूर्ण तरुणांच्या हाती ...

नातेपुते नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी मा.अतुल(बापु) पाटील विराजमान

उपसंपादक:  वैभव आठवले  (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)   नातेपुते नगरपंचायतचे बांधकाम सभापती मा.अतुल(बापु) पाटील यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बार्शीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी कामकाज पाहिले.  नातेपुते ही पहिली ग्रामपंचायत होती, त्याचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. पहिला नगराध्यक्षा होण्याचा मान उत्कर्षांराणी पलंगे यांना मिळाला, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नातेपुते नगराध्यक्षा म्हणून अनिता लांडगे या विराजमान झाल्या. उपनगराध्यक्षपदी मालोजीराजे देशमुख यांनी अडीच वर्ष कामकाज चालवले. मालोजीराजे देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली. उपनगरध्यक्षपदासाठी अतुल(बापु) पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सर्व नगरसेवक यांनी एकमताने बिनविरोध निवड केली. निवड होताच फटाके फोडून आनंद व्यक्त केला.  यावेळी उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष अनिता लांडगे, माजी नगराध्यक्षा उत्कर्षांराणी पलंगे, माजी उप...

जिजाऊ सावित्रीच्या लेकीसाठी जनजागृती चळवळ राबवण गरजेच : राजकुमार हिवरकर-पाटील

उपसंपादक वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      राज्याचे शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब यांना शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर-पाटील यांनी निर्भया पथक, पोस्को कायदा, जाणीव जागृती प्रतिबंधात्मक योजना, व्यसनमुक्ती अमली पदार्थचे दुष्परिणाम, रस्ता सुरक्षितता व वाहतुकीचे नियम याबाबतचे मागणी पत्र रामटेक या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीत दिले. सोलापूर जिल्ह्यात तसेच माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील माध्यमिक, प्राथमिक व ज्युनिअर कॉलेज यामध्ये सर्व मुख्याध्यापकांची वरील विषयांसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे आहे याबाबतचे निवेदन मी शिवसेनेच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय स्वतः आपण व आरोग्यमंत्री सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख ग्रामीण डीवायएस, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, तालुक्याचे शिक्षणाधिकारी यांना ५/४/२०२४ रोजी दिलेली आहे.       बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल तर जिल्हा, तालुक्यासह प्रत्येक शाळेवर समित्या स्थापन करणे गरजेचे आहे. मुलींना गुड टच बॅड टच या...

क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या योगदानामुळेच नारीशक्तीचा खरा सन्मान - राजकुमार हिवरकर-पाटील

उपसंपादक : वैभव अ. आठवले, साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र       महिला आर्थिक विकास महामंडळ (सोलापूर)  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस स्थापित उज्वल लोकसंचलित साधन केंद्रा नातेपुते  या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण पार खेळीमेळीत पार पडली. या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा सतीश भारती सहा. जिल्हा समन्वय अधिकारी मावीम सोलापूर, मा रणजीत शेंडे तालुका कार्यक्रम व्यवस्थापक माळशिरस तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ,मा राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना  नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते, मा सुनील गावडे शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया, नातेपुते, मा विठ्ठल पाटील शाकाधिकारी बँक ऑफ इंडिया गुरसाळे, मा योगेश पाटील RHS, ICICI बँक  सोलापूर उज्ज्वल लोकसंचालित साधन केंद्र च्या अध्यक्षा व सर्व कार्यकारणी ,बचत गटातील महिला उपस्थित होत्या.       या सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन  व प्रार्थनेने झाली.         यावेळी बोलत...

आळंदी ते पंढरपूर आरोग्यवारीचे आयोजन: राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      नातेपुते /प्रतिनिधी  श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज महाराज पालखी सोहळ्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व माळशिरस तालुका शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने  नातेपुते येथे शिवसेना भवन समोर  अरोग्य शिबिर राबवुन माऊलींच्या पालखीतील रुग्णांची सेवा करण्यात  आली.       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशान्वये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रमुख  मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील भाविकांना वैद्यकीय मदत व उपचार मिळावेत म्हणून आळंदी ते पंढरपूर आरोग्यवारीचे आयोजन करण्यात आले आहे.       त्याचबरोबर आपत्कालीन मंत्रालयाकडून जनजागृती  रथामार्फत समाज प्रबोधनाचे काम ही शिवसेना भवनावर करण्यात आले या शिबिरामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत  कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत स्वतः सहभागी असून त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी  सहाय्यक नितीन हिलाल,...

राज्य शासनाचा लाभार्थीच प्रचारक बनला पाहिजे: राजकुमार हिवरकर-पाटील

        उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      वार गुरुवार दिनांक ११/०७/२०२४ रोजी नातेपुते येथील बुरुजा जवळील समाज भूषण हॉल येथे शिवसेनेच्या वतीने महायुतीचा बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांड्याचे वाटपाचे शिबिर घेण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे बांधकाम कामगार संघटनेचे जिल्ह्याचे नेते साहेबांना तेगेळीअंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक सुर्वे  वैभव रणभिसे सुरेश लिंबोळे नाव नोंदणी शुभारंभ व  संसार उपयोगी साहित्याचे वाटप शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.      या शिबिराचे आयोजन बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली देशमुख, संदीप भागवत, राजू जाधव, अक्षय पवार यांनी या शिबिराचे आयोजन केले  होत.   यावेळी व्यासपीठावरून बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले देशाच्या स्वातंत्र्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होईपर्यंत कामगारांच्या हिताचा निर्णय आजपर्यंत घेतलेला यातील काही लाभार्थ्यांना दाखवावा ...