उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते /प्रतिनिधी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज महाराज पालखी सोहळ्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व माळशिरस तालुका शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नातेपुते येथे शिवसेना भवन समोर अरोग्य शिबिर राबवुन माऊलींच्या पालखीतील रुग्णांची सेवा करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशान्वये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील भाविकांना वैद्यकीय मदत व उपचार मिळावेत म्हणून आळंदी ते पंढरपूर आरोग्यवारीचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर आपत्कालीन मंत्रालयाकडून जनजागृती रथामार्फत समाज प्रबोधनाचे काम ही शिवसेना भवनावर करण्यात आले या शिबिरामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत स्वतः सहभागी असून त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी सहाय्यक नितीन हिलाल, सर्वज्ञ पवार, मच्छिन्द्र पवार शिवसेना असुन आरोग्यवारीचा नातेपुते येथील अकरावा दिवस होता. याप्रसंगी नातेपुते येथील माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार शंकरराव हिवरकर-पाटील, मनोज जाधव, पोपटराव शिंदे व इतर शिवसैनिक सहभागी झाले होते.
आरोग्य शिबिरात५२४५ वारकऱ्यांवर उपचार करत मुख्यमंत्री वैद्यकिया सहायता निधी बद्दल वारकरी व भाविकाना माहिती दिली जात असुन भाविकांचे अभिप्राय ऐकून घेतले जात आहेत.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.