उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
आपले नातेपुते शहराचे सुपुत्र अजिंक्य तांबडे साहेब यांची पोलीस निरीक्षक पदावर बढती होऊन चंद्रपूर येथे रुजू झाले. त्याबद्दल नातेपुते शिवसेना भवन येथे त्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आरोग्यमंत्री तानाजीराव सावंतसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना माळशिरस तालुक्याच्या वतीने नातेपुतेचे सुपुत्र अजिंक्य तांबडे साहेब यांच्या पोलीस निरीक्षक पदावरील बढती मिळाल्यामुळे नातेपुते शहराचा नावलौकिक वाढला. त्यांना चंद्रपूर येथे सेवेची संधी मिळाल्याबद्दल शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे म्हणाले सांगली, वडूज येथे बँक सेवेत रुजू झालो होतो परंतु त्यानंतर पोलीस खात्यात गेल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पंधरा ते सोळा वर्षे मुंबई ओशीवरा बॉम्ब ब्लास्ट चे आरोपी तपासात सेवा केली,परदेशी क्रिमिनलचे माहेरघर सहारा विमानतळावर तसेच मातोश्रीच्या प्रोटेक्शन शाखेला सेवा केली,क्रिमिनल ड्युटीच्या निमित्ताने योगी आदिनाथ, ममता बॅनर्जी यासारख्या नेते मंडळींना संरक्षण सेवा दिली. नुकतेच नक्षली भागातील कोरपना, चंद्रपूर येथे पदाची बढती होऊन पोलीस निरीक्षक पदावर रुजू झालो आहे.माझ्या मूळ गावातील गावकऱ्यांकडून सत्काराची थाप ही माझ्या भविष्यातील कामकाजात कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी प्रोत्साहन असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी *शिवसेना नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील, भाजपचे युवा नेते मनोज जाधव, प्रा.अविनाश तांबडे, शहरप्रमुख पोपटराव शिंदे, प्रभाग ७ चे प्रमुख सनी बरडकर, संग्राम हिवरकर पाटील, विनोद बोराटे आदि उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.