उपसंपादक : वैभव अ. आठवले, साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
महिला आर्थिक विकास महामंडळ (सोलापूर) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस स्थापित उज्वल लोकसंचलित साधन केंद्रा नातेपुते या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण पार खेळीमेळीत पार पडली. या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा सतीश भारती सहा. जिल्हा समन्वय अधिकारी मावीम सोलापूर, मा रणजीत शेंडे तालुका कार्यक्रम व्यवस्थापक माळशिरस तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ,मा राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते, मा सुनील गावडे शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया, नातेपुते, मा विठ्ठल पाटील शाकाधिकारी बँक ऑफ इंडिया गुरसाळे, मा योगेश पाटील RHS, ICICI बँक सोलापूर उज्ज्वल लोकसंचालित साधन केंद्र च्या अध्यक्षा व सर्व कार्यकारणी ,बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
या सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व प्रार्थनेने झाली.
यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी दिलेले योगदानामुळेच घराघरात नव्हे तर जगामध्ये नारी शक्तीचा सन्मान सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणून खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान करून देशाला नवा आदर्श घालून दिला. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी मुख्यमंत्र्याच्या बहिणीनेच या योजनेचा प्रचार करून लाभार्थी प्रसारक झाला पाहिजे ही भूमिका पार पाडण्याची खरी गरज आहे.
समाज कल्याण महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती महिलांना दिली. त्याचप्रमाणे महिलांसाठी गारमेंट युनिट स्थापना भविष्यात करण्यात येईल हे देखील सांगितले. त्याचबरोबर उपस्थित असणारे बँकांचे प्रतिनिधी नुसत्या आधार कार्डवर महिलांसाठी कर्ज उपलब्ध करून देतात ही खूप मोठी गोष्ट आहे, महिलांच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित एकळ व्यवस्थापक यांनी केले. त्यानंतर अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला. अहवाल वाचन संस्थेचे अध्यक्ष सुजाता खरात यांनी केले. यानंतर सन 2023-24 मध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या बचत गट, ग्रामसंघ, उत्पादक गट यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन भाषणे झाली.
यामध्ये श्री रणजीत शेंडे साहेब यांनी MSRLM च्या विविध योजना,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या विषयी माहिती दिली. माननीय सतीश भारती सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी यांनी महिला बचत गटामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे, महिलांच्या त्रिस्तरीय संस्था बांधणी, प्रभाग संघ, ग्राम संघ विषयी माहिती दिली. बचत गटांचे व्याजदर समान करणे याविषयी माहिती दिली व उज्ज्वल लोकसंचालित साधन केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वात शेवटी सुजाता खरात यांचे अध्यक्षीय भाषण झाले व आभार प्रदर्शन नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
ही सभा घेण्यासाठी उज्वल लोक संचलित साधन केंद्राच्या सर्व क्षेत्र अधिकारी, लेखापाल, ग्रामसंग लेखापाल ,सीआरपी सर्व कार्यकारणी व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाचे मार्गदर्शन यांच्या सहकार्याने झाली.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.